घरमुंबईउल्हासनगरमध्ये गावठी दारूची वाहतूक करताना एकाला अटक

उल्हासनगरमध्ये गावठी दारूची वाहतूक करताना एकाला अटक

Subscribe

मध्यवर्ती पोलिसांची धडक कारवाई

मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. या टेम्पोमधून ५७० लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प ३ येथील पंजाबी कॉलनी परिसरातील अंबिकानगर संतोषी माता मंदिराजवळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम तडवी, पोलीस हवालदार संजय सुर्वे, संतोष भुंडेरे, पोलीस नाईक अनील ठाकूर, प्रवीण पाटील, रवी गावीत हे पोलीस गस्त घालत असताना त्यांना एक टेम्पो भरधाव वेगाने रात्री दीडच्या सुमारास जाताना दिसला. पोलिसांना त्या टेम्पोवर संशय आल्याने त्यांनी तो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये गावठी हातभट्टीच्या दारूने भरलेल्या १९ रबरी टायर ट्युब सापडल्या. त्यात सुमारे ३५ हजार रूपये किंमतीची ५७० लीटर गावठी दारू होती. पोलिसांनी ३ लाख रूपयांच्या त्या टेम्पोसह दारूचा माल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार संजय सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विनायक राजपुत (वय २६) या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजार केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपस पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -