घरमुंबईमहावितरणमुळे महाराष्ट्रात सौरऊर्जेला खीळ बसणार

महावितरणमुळे महाराष्ट्रात सौरऊर्जेला खीळ बसणार

Subscribe

महावितरणची वीजदर याचिका ऐतिहासिक

स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी महावितरण सौरऊर्जा निर्मितीला खीळ घालत आहे. सरासरी ४ रुपये ते ८ रुपये ग्रीड कनेक्टेड चार्जेस वीजदर याचिकेत प्रस्तावित करून महावितरणने स्वच्छ ऊर्जेवर बेकायदेशीर बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच महावितरणच्या याचिकेतील या मागणीविरोधात अपिलीय लवादासमोर याचिका दाखल करण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने घेतला आहे.

छोटे घरगुती ग्राहक ग्रीड कनेक्टेड चार्जेस लागू झाल्याने सौरऊर्जा वापरणार नाहीत, अशी भीती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सौरऊर्जा वापरासाठी नव्याने ग्राहक पुढे येणार नाहीत किंवा सौर प्रकल्पासाठी पैसे गुंतवणार नाहीत असे होगाडे यांनी सांगितले. महावितरणने १० किलोवॉटपेक्षा अधिक वीज वापरणार्‍या ग्राहकांना ग्रीड कनेक्टेड चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण आपल्या फायद्यासाठी या वीज ग्राहकांना अतिरिकक्त ग्रीड कनेक्टेड चार्जेस प्रस्तावित करत आहे. त्यामुळे महावितरणचीच मक्तेदारी रहावी यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे होगाडे यांनी सांगितले.

- Advertisement -

वीजदर वाढीचा २० टक्के बोजा
महावितरणने वीज ग्राहकांवर २०.४ टक्के वीजदरवाढ लादणारा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर मांडला आहे. इतिहासातील सर्वात मोठी वीजदरवाढ महावितरणने प्रस्तावित केली आहे.अतिरिक्त वसुलीसाठीची मागणी करणारा प्रस्ताव महावितरणने मांडला आहे. वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणारा हा प्रस्ताव असल्याचे होगाडे यांचे म्हणणे आहे. महावितरणने छोट्या वीज ग्राहकांवर सर्वाधिक वीज दरवाढीचा बोजा टाकला आहे. तसेच उच्चदाब आणि लघुदाब व्यापारी ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे.वीज दरवाढीचा सर्वसामान्य जनतेवर बोजा पडणार नाही, यापद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मुंबई येथे आयोजित बैठकीप्रसंगी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -