घरताज्या घडामोडीडॉक्टर, डीन, प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयात एक वर्षाची वाढ

डॉक्टर, डीन, प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयात एक वर्षाची वाढ

Subscribe

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ५९ एवढे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात डीन, डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची ४०% ते ५०% पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना कालावधीत त्यांची अत्यंत कमतरता भासत आहे. तर सेवानिवृत्त होणारे डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर आणि डीन, प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात एका वर्षाची वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील दोन प्रस्तावांना आज स्थायी समितीच्या बैठकीत विना चर्चा मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे, सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या डॉक्टर, प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, डीन, डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक बनण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सेवानिवृत्तीच्या वयात एक वर्षाची वाढ करण्यास मंजुरी

सर्वात धक्कादायक व आश्चर्याचीबाब म्हणजे ८ जानेवारी रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात एका वर्षाची वाढ करण्यास आणि त्याबाबत आयुक्तांनी स्थायी समितीला डावलून परस्पर आपल्या अधिकारात घेतलेल्या निर्णयाला आणि त्यासंदर्भातील कार्योत्तर मंजुरीसाठी आलेल्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला होता. मात्र, आज सदर प्रस्ताव विनाचर्चा मंजूर झाल्याने पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांची तर पालिका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची कमतरता भासत असल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ५९ एवढे करण्याचा परस्पर निर्णय घेतला. त्यासंबंधित कार्योत्तर मंजुरीसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या ८ जानेवारीच्या बैठकित मंजूर न करता राखून ठेवण्यात आला होता. त्यावेळी या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना, भाजप, काँग्रेस आदी पक्षाच्या गटनेत्यांनी व सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, आज यासंदर्भातील प्रस्ताव बिनविरोध मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

तसेच, आज रुग्णालय डीन, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६३ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासंदर्भातील प्रस्ताव विना चर्चा आणि बिनविरोध मंजूर करण्यात आला आहे.


हेही वाचा – लसीकरणात कोणते जिल्हे आघाडीवर आणि कोणते पिछाडीवर? जाणून घ्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -