घरमुंबईऑनलाइन कवी संमेलन महिला साहित्यिकांसाठी व्यासपीठ - महापौर

ऑनलाइन कवी संमेलन महिला साहित्यिकांसाठी व्यासपीठ – महापौर

Subscribe

कोमसापच्या नवीन पनवेल शाखेचे कवी संमेलन

ऑनलाइन कवी संमेलन हे महिला साहित्यिकांसाठी व्यासपीठ असल्याचे मत पनवेल महानगरीच्या महापौर डॉ. कविता चौतमल यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाईन महिला विशेष कविसंमेलनाचे उद्घाटन करताना व्यक्त केले.कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या महिला विशेष कविसंमेलनाला नवीन पनवेल येथील भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी शुभेच्छा दिल्या.

यापुढे बोलताना महापौर डॉ. कविता चौतमल यांनी,कोरोना महामारीच्या संकटामुळे महिला कवी, साहित्यिक एकत्र भेटू शकत नाहीत पण तंत्रज्ञान माध्यमाच्या सहाय्याने महिला कवियत्रींना ऑनलाइन कवी संमेलन म्हणजे एक साहित्यिक पर्वणीच असल्याचे सांगितले.

- Advertisement -

शुभेच्छा देताना भागुबाई चांगु ठाकूर लॉ कॉलेजच्या प्राचार्या शीतला गावंड यांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रतिभावंत साहित्यिकांच्या कलागुणांना हे ऑनलाईन कवी संमेलन एक व्यासपीठ कोमसाप नवीन पनवेल शाखेने निर्माण केले आहे.महामारीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कवी संमेलने सुरू आहेत, त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे ही साहित्यिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्रा.एल.बी.पाटील यांनी, कवींनी समाजभान भान ठेवले पाहिजे. सामाजिक विषय हाताळले पाहिजेत असे मत व्यक्त करून त्यांनी या कविसंमेलनात शुभेच्छा दिल्या.

या महिला कवी संमेलनामध्ये कवियत्री अनघा तांबोळी (नवी मुंबई ) यांनी पंगत ही कविता सादर केली तर प्रा. प्रज्ञा कल्याणकर (पुणे) यांनी लाजरा चंद्र ही कविता सादर केली. संध्या देवकर (रोहा) छाया गोवारी (पनवेल) यांनी गझल सादर केली तर योगिनी वैदू (पनवेल) यांनी आई ही कविता सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात ज्योत्स्ना राजपूत यांनी,कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या उपक्रमाविषयी माहिती विषद केली. आत्तापर्यंतच्या तीन कविसंमेलनाच्या पर्वामध्ये कवींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी केले तर आभार मंदाकिनी हांडे यांनी मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -