घरक्राइमऑनलाईन मागवला साडेपाच हजाराचा ड्रेस, पार्सलमधून असं काही आलं की तुम्हीही चक्रवाल

ऑनलाईन मागवला साडेपाच हजाराचा ड्रेस, पार्सलमधून असं काही आलं की तुम्हीही चक्रवाल

Subscribe

सणासुदीचे औचित्य साधून अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी सेल सुरु केला आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात कोरोनाचे संकट असल्यामुळे आता ऑनलाईन शॉपिंग करत आहेत. परंतु, ऑनलाईन शॉपिंग महागात पडू शकते. वसईतील एका महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेने फेसबूकवर एका कंपनीच्या ड्रेसची जाहिरात दिसली. तो ड्रेस तिने मागवला. मात्र, तिला पार्सलमध्ये भलतेच काही तरी आले.

वसईत राहणाऱ्या गीता गुप्ता यांना फेसबुकवर साडेपाच हजारांचा ड्रेस दिसला,स तो ड्रेस त्यांना आवडला. सध्या सगळ्या ई-कॉमर्स कंपन्या ऑफर्स देत असल्यामुळे त्या ड्रेसवर देखील ऑफर होती. साजेपाच हजारांचा ड्रेस त्यांना १३०० रुपयांमध्ये मिळणार, अशी ऑफर होती. महागडा ड्रेस कमी किंमतीत मिळतोय म्हणून त्यांनी तो ऑर्डर केला. मात्र, दोन दिवसात जेव्हा पार्सल आले, ते पार्सल पाहून त्यांना धक्काच बसला. या पार्सलमध्ये त्यांना चक्क रद्दीतल्या, वापरलेल्या जुन्या साड्या होत्या. हे पार्सल चुकून आले असावे म्हणून त्यांनी पुन्हा ऑर्डर केली. तर पुन्हा एकदा तसेच झाले. तेव्हा त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

- Advertisement -

गीता गुप्ता यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या, मात्र, त्यांनी तक्रार न करताच घरी माघारी परतल्या. यावर प्रतिक्रिया देताना माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, पुन्हा तक्रार दिली तर आम्ही ती नोंदवून घेऊ. शिवाय, त्यांनी स्टेशन डायरीमध्ये महिलेचे नाव लिहून घेतल्याचे देखील सांगितले. या वेळी त्यांनी नागरिकांना ऑनलाईन खरेदी करताना सावध राहा, असे आवाहन केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -