घरमुंबईबेस्टचा अजब कारभार; रुमाल बांधून आलेल्यांना बेस्टमध्ये दिला नाही प्रवेश

बेस्टचा अजब कारभार; रुमाल बांधून आलेल्यांना बेस्टमध्ये दिला नाही प्रवेश

Subscribe

मास्क नसल्याने शेकडो प्रवासी बेस्टच्या प्रवासाला मुकले, प्रवासी आणि वाहकांमध्ये मोठे वाद

मास्क नसल्यास बसेस, टॅक्सी, रिक्षांमध्ये प्रवाशांना प्रवेश देऊ नये. वाहनांमध्ये ‘मास्क नाही, प्रवेश नाही’, ‘नो मास्क, नो एन्ट्री’, अशा आशयाचे स्टीकर्स लावण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले होते. त्याची अंमलबजावणीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मात्र, याचा फटका रुमाल वापरणार्‍या शेकडो नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेस्टच्या शेकडो प्रवाशांना बसेसमध्ये एन्ट्री दिली गेली नाही. त्यामुळे प्रवासी आणि बेस्टच्या वाहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादसुद्धा झाले आहेत.

कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्क वापरण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती सोबत मास्क न वापरणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी नुकतेच दिले होते. मात्र, त्याचा उलटा अर्थ घेत बेस्टच्या कर्मचार्‍यांकडून फक्त मास्क लावणार्‍या प्रवाशांनाच बेस्ट बसेसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. ज्यांनी मास्क ऐवजी तोंडाला रुमाल किंवा ओढणी बांधली असेल त्या प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश देण्यास नाकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना बेस्टच्या बसेसमधून खाली उतरविण्यात आले. इतकेच नव्हेतर अनेक प्रवाशांनी बेस्टच्या वाहकांसोबत भांडणसुद्धा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेस्टच्या बस क्रंमाक १, ५१, ४०४ च्या बसेसमधून दादर प्लाझा स्टॉपवर अनेक प्रवाशांना बसेसमध्ये बसू देण्यात आले नाही. कारण त्यांनी मास्क ऐवजी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यानंतर त्यांनी बेस्टच्या प्रशासनाकडे यासंबंधीची तक्रारी केली आहे. या घटनेसंबंधी ‘दैनिक आपलं महानगर’ने बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोरोना काळात प्रवाशांना बेस्टच्या बसेसमध्ये प्रवास करताना मास्क लावणे अनिवार्य आहे. मात्र, ज्यांच्याकडे मास्क नाही अशा प्रवाशांनी तोंडाला ओढणी किंवा रुमाल बांधले तरी चालेल. फक्त प्रवाशांनी तोंडाला कापड किंवा मास्क लावणे गरजे आहे.

- Advertisement -

एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा आपल्या फेसबुक लाईव्हमधून जनतेशी संवाध साधला होता. या संवादात मुख्यमंत्री यांनी जनतेला सांगितले होते की, कोरोना काळात आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, घराबाहेर जात असताना मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधा. मात्र, बेस्टचे वाहक तोंडाला रुमाल बांधलेल्या प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, बेस्ट प्रशासनाने तात्काळ बेस्ट वाहकांना मास्क आणि रुमाल याबाबत फरक काय? हे समजून सांगावे, तसेच बेस्ट बसेसमध्ये प्रवाशांनी तोंडावर कापड किवा रुमाल असल्यास त्यांना रितसर प्रवेश देण्यात यावेत, अशी मागणी बेस्ट प्रवासी निखिल लोखंडे यांनी केली आहे.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -