घरट्रेंडिंगOxygen Man Shahnawaz Shaikh: २३ लाखांची कार विकली अन् ४ हजार कोरोना...

Oxygen Man Shahnawaz Shaikh: २३ लाखांची कार विकली अन् ४ हजार कोरोना रूग्णांना दिला ऑक्सिजन सपोर्ट

Subscribe

ऑक्सिजन मॅनने मुंबईतील ४ हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलेंडर देऊन मदत केली आहे.

राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थिती एक तरुण रुग्णांसाठी देवदूत बसून आला आहे. ज्याला सगळे ऑक्सिजन मॅन (Oxygen Man ) ओळखत आहेत. ऑक्सिजन अभावी मृत्यूशी सामना करणाऱ्या रुग्णांना हा ऑक्सिजन मॅन ऑक्सिजन सिलेंडर पुरवत आहे. रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यासाठी तो जिवाचे रान करत आहे. ऑक्सिजन मॅन एका फोनवर रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचे काम करतो. आतापर्यंत या ऑक्सिजन मॅनने मुंबईतील ४ हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलेंडर देऊन मदत केली आहे. सध्या या ऑक्सिजन मॅनचे सोशल मीडिया त्याचप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रचंड कौतुक होत आहे.

शाहनवाज शेख असे ऑक्सिजन मॅनचे नाव आहे. गेल्या एक वर्षांपासून शाहनवाज ऑक्सिजन सिलेंडर देऊन रुग्णांची मदत करत आहे. विशेष म्हणजे शाहनवाजने रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा करता यावी यासाठी स्वत:ची तब्बल २३ लाखांची SUV कार विकली. त्या पैशातून त्यानी १६० ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतले. तर ४० सिलेंडर भाड्याने घेतले. सध्या शाहनावाजकडे एकूण २०० ऑक्सिजन सिलेंडर आहेत. जानेवारी २०२० मध्ये शाहनवाजला ऑक्सिजनच्या मदतीसाठी ५० फोन कॉल्स यायचे. मात्र पुढील काहीच महिन्यात परिस्थिती बिघडली. आता शाहनवाजला ५०० ते ६०० फोन कॉल्स येतात. मात्र आता शाहनवाजला केवळ १० ते २० लोकांपर्यंतच ऑक्सिजन सिलेंडर पोहचवता येतात.

- Advertisement -

मित्राच्या बायोकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शाहनवाजच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या बायकोला कोरोनाची लागण झाली. तिला ऑक्सिजनची गरज असताना ऑक्सिजन उपलब्ध झाले नाही. या घटनेचा शाहनवाजला मोठी धक्का बसला. ऑक्सिजन न मिळणाऱ्या लोकांना मदत करण्याचे शाहनवाजने ठरवले. त्यानुसार त्याने मुंबईतील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पोहचवण्याचे काम सुरु केले.


हेही वाचा – वाह रे पठ्ठ्या! कोरोनाला भिडणारा ९० वर्षांचा बहादूर, विषाणूला दुसर्‍यांदा धोबीपछाड

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -