वाह रे पठ्ठ्या! कोरोनाला भिडणारा ९० वर्षांचा बहादूर, विषाणूला दुसर्‍यांदा धोबीपछाड

आजोबांना कोरोनाची काही लक्षणे आढळल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता ३० एप्रिलला चाचणी पॉझिटिव्ह आली.

90-year-old grandfather fights corona for second time in beed maharashtra
वाह रे पठ्ठ्या! कोरोनाला भिडणारा ९० वर्षांचा बहादूर, विषाणूला दुसर्‍यांदा धोबीपछाड

राज्यात कोरोनाचे सावट आहे. यामुळे संपूर्ण देशासह राज्यात एक प्रकारची नकारात्मकता आहे. कोरोनाने सर्वांच्या मनात मृत्यूने भय निर्माण केले आहे. कोरोना झाला म्हणजे माणूस मरणार अशी भावना लोकांच्या मनात आहे. सोशल मीडिया,बातम्यांमुळे कोरोनाच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्याने सर्वांचे मन हेलावून गेले आहे. मात्र या सगळ्याला छेद देत एका नव्वद वर्षांच्या आजोबांनी एक नवा विक्रम रचला आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्हा जिथे सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्याच बीड जिल्ह्यात आजोबांनी कोरोनाला दोनवेळा धोबीपछाड करुन ते सुखरुपणे घरी परतले आहे. सुरु असलेल्या भयाण परिस्थिती आजोबांनी एक सकारात्मक जाणीव करुन दिली आहे.

पांडुरंग आत्माराम आगलावे असे कोरोनाला दोन वेळा शह देणाऱ्या नव्वद वर्षांच्या बहादूर आजोबांचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आडस येथे ते राहतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १३ नोव्हेंबरला आजोबांना कोरोनाची लागण झाली होती. नव्वद वर्षांचे आजोबांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. याआधीही अनेक संकटे त्यांनी पाहिली. कोरोनाचे संकटही त्यांच्यासाठी काहीच नव्हते म्हणूनच १० दिवशीच पांडुरंग आजोबा कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन सुखरुप घरी परतले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र पुन्हा एकदा आजोबा कोरोनाच्या विळख्यात सापडले. आजोबांना कोरोनाची काही लक्षणे आढळल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता ३० एप्रिलला चाचणी पॉझिटिव्ह आली. पहिल्या लाटेत कोरोनाला धुळ चारणाऱ्या नव्वद वर्षांच्या पठ्ठ्याने दुसऱ्यांदाही कोरोनाला छोबीपछाड केले. दुसऱ्या वेळी आजोबांना श्वास घेण्यास त्रास होणे,HRCT स्कोर कमी होणे यामुळे परिस्थिती बिकट झाली. त्यांचे कुटुंबियही घाबरले मात्र कोरोनाला पुन्हा एकदा धुळ चारत आजोबा १४ व्या दिवशीच सामान बांधून घराकडे निघाले. एवढच नाही तर घरी परतत असताना आजोबांनी कोरोनाला न घाबरता त्याला धीराने समोरे जा,मास्क लावा, अंतर पाळा,शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहनही केले.


हेही वाचा – शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल- नवाब मलिक