घरताज्या घडामोडीपालिकेने हिंदू महासभा रुग्णालयाला त्वरित व वेळेत ऑक्सिजनसाठा पोहचवला

पालिकेने हिंदू महासभा रुग्णालयाला त्वरित व वेळेत ऑक्सिजनसाठा पोहचवला

Subscribe

सर्व ६० रुग्ण सुरक्षित

घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात कोविड बाधितांसाठी ऑक्सिजनसाठ्याची कमतरता जाणवत असल्याची माहिती प्राप्त होताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या रुग्णालयात ऑक्सिजन साठा पोहोचवला. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व ६० रुग्ण सुरक्षित आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठा पुरेसा उपलब्ध राहील. विशेषतः कोविड बाधित रुग्णांना ऑक्सिजन अभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन अतिशय सतर्क आहे. महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन तसेच ऑक्सिजन पुरवठादार यांच्याशी समन्वय राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती केली आहे. तसेच महानगरपालिकेने नेमलेली पथके प्राणवायूचे उत्पादन ते वितरण होईपर्यंतच्या साखळीवर लक्ष ठेवून आहेत.

एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा रुग्णालयात एकूण ६१ कोविड बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये ५० जणांना ऑक्सिजन पुरवला जात आहे तर ११ रुग्ण जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) वर आहेत. सायंकाळी ६.३० पर्यंत पुरेल, इतकाच ऑक्सिजनसाठा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने महानगरपालिकेला कळवली.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या एस विभागातून ९ जंबो सिलेंडर या रुग्णालयात सायंकाळी ६.१५ वाजता पोहचवले. त्या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या नियमित ऑक्सिजन पुरवठादाराने ४ ड्युरा सिलेंडर रुग्णालयात सायंकाळी ६.१५ च्या सुमारास पोहोचवले. ते जोडून त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखला गेला. त्यासोबत एन विभागातून देखील १५ जंबो सिलेंडर बॅकअप म्हणून त्वरित पाठवण्यात आले. एवढेच नव्हे तर, रुग्णांना स्थलांतरित करण्याची गरज भासली तर त्यासाठी रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सुदैवाने आणि महानगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याची आवश्यकता भासली नाही. हिंदू महासभा रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.

दरम्यान, हिंदू महासभा रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा संदर्भात भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून, रुग्णालयाच्या परिसरात प्राणवायू व्यवस्था उभी करण्याविषयी एन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात उद्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनासमवेत तातडीची बैठक देखील होणार आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचतो आहे. ऑक्सिजनचा वापर योग्यरित्या आणि काटकसरीने होतो आहे, यावर महानगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तातडीच्या प्रसंगासाठी ऑक्सिजन उत्पादकांना लागलीच सूचित करून तत्परतेने ऑक्सिजन पोचविण्याची कार्यवाही केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nashik Oxygen Tank Gas leakage: नाशिक दुर्घटनेवर PM to CM, कोण काय म्हणाले ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -