घरताज्या घडामोडीधनंजय मुंडेंमुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडेंचा पराभव

धनंजय मुंडेंमुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडेंचा पराभव

Subscribe

दोन महिन्यापुर्वीच झालेच्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत धनंजय मुंडे यांनी आपली बहिण पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांना पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. आज बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. निकाल १३ जानेवारी रोजी लागणार असला तरी पंकजा मुंडे यांनी थेट अमेरिकेतून या निवडणुकीबाबत ट्विट करत आपला पराभव मान्य केला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर आता त्याचे पडसाद स्थानिक निवडणुकात दिसत आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीमुळे पंकजा मुंडे यांनी निवडणुकीआधीच आपला पराभव मान्य केला आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, “राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही झाला असून लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहे.”

- Advertisement -

राज्यात सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही होताना दिसत आहे. कालच जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यासोबत जुळवून घेतल्यामुळे भाजपला जळगावचा गड अबाधित राखण्यात यश आले होते. त्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपकडे असलेली जिल्हा परिषद राखणार का? याबाबत चर्चा सुरु झाली होती. मात्र शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा रोवण्यासाठी भाजपनेही बरेच प्रयत्न केले. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. बीड जिल्हा परिषदेत एकूण ६० सदस्य असून यापैकी धस गटाचे ५ सदस्य अपात्र ठरले आहेत. तसेच दोन आमदार सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे एकूण सदस्यांचा आकडा ५३ झाल्यामुळे बहुमताचा आकडाही २७ पर्यंत येऊन ठेपला.

धनंजय मुंडे गटाकडे २३ सदस्य आणि शिवसेनेचे चार सदस्य मिळून हा आकडा २७ वर पोहोचलेला आहे. तर भाजपगटाकडे २६ सदस्य असल्याचा दावा केला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -