घरमुंबईपनवेलमध्ये मांडूळ जातीचा साप ५० लाखात विकणारा गजाआड

पनवेलमध्ये मांडूळ जातीचा साप ५० लाखात विकणारा गजाआड

Subscribe

पनवेल बस स्थानक परिसरात रायगड तळा येथून मांडूळ जातीचा साप ५० लाख रुपयांच्या बोलीवर विक्री करण्यास आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून हा साप जप्त करण्यात आला आहे.

पनवेल बस स्थानक परिसरात रायगड तळा येथून मांडूळ जातीचा साप ५० लाख रुपयांच्या बोलीवर विक्री करण्यास आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून हा साप जप्त करण्यात आला आहे. प्रसाद संतोष जाधव (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो रायगड जिल्ह्यातील तळा येथे बारमध्ये वेटर म्हणून काम करतो. तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी या गावचा आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रसाद जाधव हा पनवेल बस स्थानक परिसरात मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार आणि त्यांच्या साथीदारांनी सापळा रचून प्रसाद याला आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या प्रवाशी बॅगमध्ये मांडूळ जातीचा जिवंत साप बिना परवाना अवैधरित्या जवळ बाळगून लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने आला असता त्याला पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. यावेळी त्याच्यावर भा. दंड. वि. कलम ४२०, ५११ सह वन्य प्राणी १९७२ चे कलम ५१, ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मांडूळ या सापाचा उपयोग काळी जादूसाठी आणि औषधी पदार्थ बनविण्यासाठी केला जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -