घरमुंबईअंबरनाथमधील शाळेचा सहलीचा अर्ज पाहून पालक संभ्रमात

अंबरनाथमधील शाळेचा सहलीचा अर्ज पाहून पालक संभ्रमात

Subscribe

या अर्जामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात शाळेच्या शिक्षकांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही.

अंबरानाथमधील फातिमा स्कूलमधील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांची सहल पनवेलमधील रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पनवेलमधील एका रिसॉर्टमध्ये सहल जाणार आहे. यासाठी शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांना एक अर्ज भरुन देण्यास सांगितला आहे. या अर्जात सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर कोणती दुर्घटना घडल्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे सहमती पत्र पालकांना शाळेकडे भरुन द्यायचे आहे. या अर्जामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात शाळेच्या शिक्षकांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. शाळेचे सर्व निर्णय फादर जॉन घेतात. त्यांना तुम्ही विचारा, असे शिक्षकांनी सांगितले. तर फादर जॉन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा – सोशल मीडियावरील वादानंतर भाजपा नेत्याला हवाय घटस्फोट!

सहलीचे पैसे परत मागता येत नाहीत

अंबरनाथ (प) येथील सुभाषवाडी परिसरात फातिमा हायस्कूल ही कॉन्व्हेंट शाळा आहे. येत्या शनिवारी शाळेच्या मुलांची सहल पनवेलच्या रिसॉर्टमध्ये जात आहे. विद्यार्थ्यांकडून सहलीचे ६५० रुपये घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेतर्फे विद्यार्थ्यांना एक अर्ज देण्यात आला. या अर्जावर शाळेने पालकांची सही घेऊन आणण्यास सांगितले. या अर्जामध्ये स्पष्टपणे लिहले आहे की, मुलांकडील कोणतीही वस्तू हरविल्यास व त्यांना इजा व अपघात झाल्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही. या अर्जामुळे पालक चिंतीत झाले आहेत. मुलांना सहलीला पाठवायचे की नाही? अशी चिंता पालकांना सतावत आहे. दरम्यान शाळा प्रशासनाने अगोदरच विद्यार्थ्यांकडून सहली साठीचे पैसे घेतल्याने ते पैसे परत मागता येत नसल्याची तक्रार पालकांनी केली.

- Advertisement -

शाळेच्या आवारात असलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणे हे शाळेचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे शाळेने आयोजित केलेल्या सहलीत विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा शाळा प्रशासनाची आहे. त्यामुळे असे अर्ज भरुन घेणे चुकीचे आहे.
राज असरोंडकर (कायद्याने वागा संघटना अध्यक्ष)

हेही वाचा – जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -