घरदेश-विदेशसोशल मीडियावरील वादानंतर भाजपा नेत्याला हवाय घटस्फोट!

सोशल मीडियावरील वादानंतर भाजपा नेत्याला हवाय घटस्फोट!

Subscribe

दरम्यान नीतू निषाद यांना ३० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारमधील मागासवर्गीय कल्याण मंत्री बाबूराम निषाद यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी नीतू निषाद यांनी सोशल मीडियावर पती बाबूराम निषाद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे बाबूराम निषाद आणि त्यांच्या पत्नीमधील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान नीतू निषाद यांना ३० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पती विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी बाबूराम निषाद यांच्या पत्नी नीतू निषाद यांनी फेसबुकवर पोस्ट करत पतीविरोधात मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे बाबूराम निषाद आणि त्यांच्या पत्नीविरोधातील वाद चव्हाट्यावर आला. यापूर्वी नीतू निषाद यांनी बाबूराम निषाद यांच्याविरुद्ध लखनऊच्या कैसरबाग पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. पण मंत्र्यांच्या दबावामुळे पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा आरोप नीतू निषाद यांनी केला आहे. त्यानंतर नीतू निषाद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी पत्र लिहून पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने नीतू निषाद यांना ३० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पीएमसी खातेदारांसाठी गुड न्यूज; आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली

का हवा आहे घटस्फोट?

१० मे २००५ रोजी बाबूराम निषाद आणि नीतू निषाद यांचा हिंदू रितीरिवाजानुसार विवाह पार पडला. पत्नी पासून घटस्फोट देण्याच्या कारणात बाबूराम निषाद यांनी त्यांच्या पत्नीला वैवाहिक जीवनामध्ये रस नाही, असा दावा केला आहे. तसेच पत्नी नीतू निषाद माझ्याकडे लाखो रुपयांची मागणी करते. पण मी तिची ही मागणी पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे माझ्या पत्नीसोबत राहणं मला शक्य नाही, असे त्यांनी घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -