घरताज्या घडामोडीमुंबईतील पदपथ अतिक्रमण मुक्त होणार

मुंबईतील पदपथ अतिक्रमण मुक्त होणार

Subscribe

सध्या मुंबई शहर काही बाबतीत कात टाकत आहे. डांबरी रस्त्यांचे रूपांतर सिमेंट काँक्रीटमध्ये होत आहे. बस स्टॉपचे स्वरूप बदलण्यात येत आहे.

मुंबईतील पदपथ (BMC Footpath of Mumbai) लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत. प्रत्येक प्रभागातील सर्व पदपथ अतिक्रमण मुक्त, फेरीवाला मुक्त करण्याबाबत संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी दिले आहेत. (Pedestrian encroachment in Mumbai will be free)

सध्या मुंबई शहर काही बाबतीत कात टाकत आहे. डांबरी रस्त्यांचे रूपांतर सिमेंट काँक्रीटमध्ये होत आहे. बस स्टॉपचे स्वरूप बदलण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, आता पादचाऱ्यांना त्रासदायक ठरणारे व पदपथांवर अतिक्रमण करणारे फेरीवाले हटवून पदपथ मोकळे करून त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मुंबईत वांद्रे, घाटकोपर, कांदिवली, गोरेगाव, कुर्ला, गोवंडी, शिवाजी नगर, भांडुप, मुलुंड, भायखळा, दादर, परळ, दहिसर, अंधेरी गोरेगाव आदी परिसरात लहान व मोठ्या रस्त्यांवर, पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचार्यांना चालायला त्रास होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दुकानांवर ३० जूनपर्यंत मराठीत पाट्या न लावल्यास कारवाईचा बडगा

पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवरही कारवाई

- Advertisement -

मुंबईतील काही पदपथांवर काही लहान – मोठया दुकानदारांनीही कमी – अधिक प्रमाणांत अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या दुकानदारांनी पदपथांवर अतिक्रमण केले आहे, त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पदपथ मोकळे होणार असून सदर पदपथ आवश्यक त्या ठिकाणी रुंद करण्यात येणार आहेत.

सब वे चे होणार सौंदर्यीकरण

मुंबई महापालिका वाहतूक बेटे, उड्डाणपुलाखालील जागेत सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर आता मुंबईतील सब वे च्या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सब वे च्या ठिकाणी झालेले विद्रुपीकरण दूर होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी दिली. तसेच, मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड आदी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मात्र या प्रकल्पामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, याची विशेष काळजी घेतली असून त्या ठिकाणची पाहणी केल्याचे शर्मा यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘अग्निपथ’ विरोधात राष्ट्रवादी युवक रस्त्यावर; राज्यभर युवक व विद्यार्थी आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -