घरमुंबई42 अंश सेल्सिअस तापमानातही लोकांचा मतदानाचा उत्साह कायम

42 अंश सेल्सिअस तापमानातही लोकांचा मतदानाचा उत्साह कायम

Subscribe

तीन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला, मात्र काही सेकंदातच यंत्रे पूर्ववत करण्यात आली.

एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना शहर आणि परिसरात मतदानाचा उत्साह मात्र कायम राहिला. सकाळपासूनच मतदानाच्या राष्ट्रीय महाउत्सवात सामील होण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. वयोवृद्ध मतदारदेखील मतदानासाठी पुढे आले होते.रायगड लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. महाडसह पोलादपूर तालुक्यात कडाक्याचे ऊन आणि वाढलेले तापमान यामुळे मतदारांनी सकाळीच मतदानासाठी गर्दी केली होती. शहर आणि परिसरातील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत गेले असताना मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखविला. दिव्यांग मतदार देखील यावेळी देण्यात आलेल्या सुविधांचा वापर करीत उत्स्फुर्तपणे मतदानासाठी येत होते. वयोवृद्ध मतदार हेही यामध्ये सामील झाले होते. तालुक्यात हा उत्साह कायम राहिला होता. मतदान केंद्रावर पाण्याची, दिव्यांगांना व्हीलचेअर आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते.

दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांनी बाहेर पडणे टाळले. दुपारी तीन वाजेपर्यंत महाड मतदारसंघात फक्त 46 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. मतदान केल्यानंतर बोटावरील शाई दाखवत सेल्फी काढून अनेक तरुण मतदारांनी आनंद साजरा केला. मतदान कसे केले जाते, याची उत्सुकता लागून राहिलेल्या नवमतदारांनी देखील मतदान केल्याचा आनंद दिसून येत होता. औद्योगिक क्षेत्रातील कामगार मतदान केल्यानंतर आपल्या कामावर रूजू झाले.

- Advertisement -

महाडमध्ये मतदान यंत्रांची तक्रार कुठे दिसून आली नसली तरी दोन गावांत मात्र यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारी पुढे आल्या. यामध्ये यंत्रांच्या बॅटरी नादुरुस्त झाल्या, मात्र कांही मिनिटातच ही समस्या दूर करण्यात आली.

आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी (रोहे) येथे कुटुंबासमवेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पिंपळदरी गावी, तर माजी आमदार माणिक जगताप यांनी संदोशी येथे मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

महाड येथील 107 वर्षे वयाच्या सुलोचना गोविंद शिंदे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केंद्रावर असलेले निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांचे स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -