Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी शिवाजी मंडईतील मासेविक्रेत्यांचे क्रॉफर्ड मार्केटमध्ये होणार कायमस्वरुपी स्थलांतर

शिवाजी मंडईतील मासेविक्रेत्यांचे क्रॉफर्ड मार्केटमध्ये होणार कायमस्वरुपी स्थलांतर

धोकादायक शिवाजी मंडई पाडून त्याजागी पालिकेची इमारत उभारणार

Related Story

- Advertisement -

मुंबईतील पलटन रोड येथील मनीष मार्केटजवळील पालिकेच्या धोकादायक शिवाजी मंडईचे कोर्टाच्या आदेशाने पाडकाम करण्यात येत आहे. ही मंडई पूर्णपणे पाडल्यानंतर येथील मासे विक्रेत्यांना याच ठिकाणी पुढील महिन्याभरात तात्पुरती शेड उभारून देण्यात येणार आहे. मात्र या मासे विक्रेत्यांच्या मागणीनुसार नजीकच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये ऑगस्ट २०२२ पर्यन्त कायमस्वरुपी स्थलांतर करण्यात येणार आहे. सध्या या क्रॉफर्ड मार्केटच्या विस्ताराचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवाजी मंडईमधील मासे विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, धोकादायक शिवाजी मंडई पडून काही दुर्घटना घडल्यास पालिका व महापौर यांना जबाबदार धरण्यात येणार होते, त्यापासून त्यांनाही सुटकेचा निःश्वास सोडता येणार आहे.

शिवाजी मंडई गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आली होती. मात्र ही मंडई पाडण्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र या मंडईचे पाडकाम झाले नव्हते. मासे विक्रेते याच ठिकाणी आपला व्यवसाय जीव मुठीत धरून करीत होते. या मंडईमध्ये तळमजल्याला मासे विक्री होत होती तर पहिल्या मजल्यावर कार्यालये होती. या मंडईचे आरक्षण पालिकेने बदलले असून त्या जागेवर पुढील काळात पालिकेची कार्यालयीन इमारत थाटण्यात येणार आहे. त्यामुळे येथील मासे विक्रेत्यांना पालिकेने शहर व उपनगरातील विविध मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात येणार होते. मात्र त्यास येथील मासे विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला व नजीकच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याची मागणी लावून धरली होती.

- Advertisement -

त्यामुळे पालिकेने त्यांची मागणी अखेर मान्य केली आहे. सध्या क्रॉफर्ड मार्केटच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या विस्तारित जागेत शिवाजी मंडईमधील मासे विक्रेत्यांचे ऑगस्ट २०२२ पर्यन्त स्थलांतर करण्यात येणार आहे. तोपर्यंत या मासे विक्रेत्यांची तात्पुरती व्यवस्था ही शिवाजी मंडईचे पाडकाम पार पाडल्यानंतर एका बाजूला करण्यात येणार आहे.

- Advertisement -