घरCORONA UPDATECorona Vaccination : कुर्ला भाभा रुग्णालयात लसीचा तुटवडा, नागरिकांचे हाल

Corona Vaccination : कुर्ला भाभा रुग्णालयात लसीचा तुटवडा, नागरिकांचे हाल

Subscribe

भाभा रुग्णालयात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने म्हाडा कॉलनीमधून लस घेण्यासाठी आलेल्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. 

मुंबईत सध्या कोरोनावरील लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रांवर रांगा लावूनही लस मिळण्यात अडचण होत आहे. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक यांना लस न घेताच नाईलाजाने घरी परतावे लागत आहे. पालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात लसीकरणासाठी गेलेल्या म्हाडा कॉलनीतील काही नागरिकांना, विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही लसीच्या तुटवड्याचा असाच काहीसा फटका बसला व त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले आहे.

मुंबईत सध्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिका आरोग्य खात्यामार्फत कोविड सेंटर, पालिका रुग्णालये आदी ठिकाणी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने पालिकेला अनेकदा लसीकरण मोहीम थांबवावी लागली आहे. त्यामुळे लसीचा पहिला व दुसरा डोस घेणारे ताटकळत आहेत.

- Advertisement -

खासगी रुग्णालयात महागड्या दरात लसीकरण होत आहे. मात्र, गरीब, सामान्य, मध्यम वर्गातील नागरिकांना कोरोनामुळे नोकऱ्या, रोजगार गमावलेल्या नागरिकांना खासगी रुग्णालयांत लसीचा डोस घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना पालिका, सरकारी रुग्णालये, दवाखाने येथे सुरू असलेल्या लसीकरणावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या लसीकरण केंद्रांवर गेल्यावर रांग लावूनही कधी-कधी लस मिळत नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करतात. कमी लस असल्यास अथवा लसीचा तुटवडा असल्यास लसीकरण केंद्र बंद ठेवण्याबाबत पालिका आधीच नागरिकांना कळवते.

कधीतरी लसीचा तुटवडा असताना नागरिकांना त्याची पूर्वकल्पना दिली जात नसल्याने संपूर्ण दिवसभर लसीसाठी रांग लावणाऱ्या नागरिकांना जेव्हा त्यांचा नंबर येण्यापूर्वी काही वेळ अगोदरच लसीचा साठा संपल्याचे समजते. त्यामुळे ते तीव्र संताप व्यक्त करतात. असाच प्रकार कुर्ला येथील भाभा रुग्णालयात घडल्याचे म्हाडा कॉलनी येथील महिलांनी सांगितले. या रुग्णालयात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने म्हाडा कॉलनीमधून लस घेण्यासाठी आलेल्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -