घरताज्या घडामोडीकरोनासंदर्भात मोदी करणार देशाला संबोधन

करोनासंदर्भात मोदी करणार देशाला संबोधन

Subscribe

देशातील नागरिकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी याविषयी मोदी आज रात्री ८ वाजता बोलणार आहेत.

देशभरात परसत चाललेला करोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘कोविड १९’ आणि तो रोखण्यासाठी उपाययोजना संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना संबोधन करणार आहेत. देशातील नागरिकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी याविषयी मोदी आज रात्री ८ वाजता बोलणार आहेत. पंतप्रधान स्व:त कोविड रोखण्यासाठीच्या उपाययोजना देशाला सांगणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

इटलीमधून परतलेल्या एका मुलीने पंतप्रधान मोदी यांना दुसरा पिता म्हटले. नागरिकासांठी हवी ती मदत करू पण हे केवळ टीमवर्कमुळेच शक्य आहे. करोना पासून देशाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे मी कौतुक करतो.असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केल आहे.

- Advertisement -

आतापर्यत देशभरात करोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. देशात एकूण १५३ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर यात ३ करोग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. परदेशातून आलेल्या २७६ भारतीयांना करोनाची लागण झाल्याचे समार येत आहे. त्यामुळे राज्याभरात सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील शाळा, महाविद्यालये , नाट्यगृहे , सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्यानच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांनी या प्रयत्नांनच कौतुक केल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -