घरमुंबईज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

Subscribe

५० वर्ष रेषा आणि शब्दांच्या फटकाऱ्यांतून राजकीय- सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी दहाच्या सुमारास निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. विकास सबनीस गेला आठवडाभर रुग्णालयात उपचार घेत होते. अधिक तपासणीसाठी त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सबनीस यांचा जन्म १२ जुलै १९५० ला झाला. त्यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातून शिक्षण पुर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करणे नाकारून त्यांनी स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केले. सबनीस यांच्या व्यंगचित्र कारकीर्दीला यंदाच ५० वर्षे पूर्ण झाली होती. हे हरहुन्नरी व्यंगचित्रकार होते, त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांचा पगडा होता. त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात मुंबई सकाळ, संडे आँबझरवर,मार्मिक,सामना, तरुण भारत आणि आपलं महानगर मधून त्यांनी व्यंगचित्रे काढली. त्यांच्या व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मागील वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सत्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला होता.

सबनीस यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. परदेशातील काही नियतकालिकांमध्ये तसेच इंग्रजीतील साप्ताहिकांतही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यांचे ‘व्यंगनगरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -