घरमुंबईनितीन राऊतांनी महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं - प्रविण दरेकर

नितीन राऊतांनी महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं – प्रविण दरेकर

Subscribe

वीज कंपन्यांकडून सामान्य वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला आहे. या मुद्द्यावरून मनसेनं सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिलेला असतानाच भाजपनं शुक्रवारीच महावितरणच्या प्रतापगड या मुख्यालयावर मोर्चा नेऊन आपला निषेध व्यक्त केला. या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. ‘भाजप नेत्यांनी वीजबिलं माझ्याकडे आणावीत, ती मी तपासून पाहीन, जर वाढीव बिलं नसली, तर पूर्ण बिल आम्ही भरू असं देखील आश्वासन त्यांनी द्यावं’, असं आव्हान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्याला आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

नितीन राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘नितीन राऊत यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्येच क्लार्कची नोकरी घ्यावी. म्हणजे मग आम्ही त्यांना बिलं तपासायला देऊ. विजेची बिलं तपासणं हे काय मंत्र्यांचं काम आहे का? नितीन राऊत आधी म्हणाले १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देऊ, आता त्यावर म्हणतायत सवलत देऊ’.

- Advertisement -

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी १०० युनिटपर्यंतचं वीजबिल माफ केलं जाईल अशी घोषणा केली होती. कोरोनाच्या काळात ग्राहकांना आलेल्या वीजबिलांमधून दिलासा मिळावा यासाठी ही घोषणा केली होती. मात्र, काही दिवसांमध्येच त्यांनी ही घोषणा फिरवून सगळ्यांना आलेलं वीजबिल भरावं लागेल, असं जाहीर केलं. त्यामुळे राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारसोबतच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर देखील टीका केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -