घरताज्या घडामोडीशिवसेनेकडून राजकीय परंपरेला सुरुंग - प्रवीण दरेकर

शिवसेनेकडून राजकीय परंपरेला सुरुंग – प्रवीण दरेकर

Subscribe

शिवसेनाप्रमुख हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणाऱ्यांसाठी दर्शनाचा विषय प्रतिष्ठेचा करण्याचे कारण नव्हते

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले म्हणून त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक परंपरेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेक (Pravin Darekar) यांनी गुरुवारी केली. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नारायण राणे यांनी आज शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसैनिकांकडून स्मृतीस्थळाला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी शिवसेनेच्या कृतीवर टीका केली आहे. (Pravin darekar slam shiv sena )

नारायण राणे यांची राजकीय जडणघडण खऱ्या अर्थाने शिवसेनेत झाली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना घडवले. शिवसेनाप्रमुख हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणाऱ्यांसाठी दर्शनाचा विषय प्रतिष्ठेचा करण्याचे कारण नव्हते, असे दरेकर म्हणाले. श्रध्दास्थान हे पक्षाच्या चौकटीत, व्यक्तीच्या चौकटीत, घराच्या चौकटीत किंवा जातीच्या चौकटीत बांधता येत नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

बाळासाहेबांचे दर्शन घेण्याचा अधिकार सर्वांनाच

बाळासाहेब ठाकरे केवळ शिवसेनेचे दैवत नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचे तसेच हिंदुस्तानचे हिंदुह्रदयसम्राट आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे दर्शन घेण्याचा अधिकार देशातील प्रत्येक धर्माच्या प्रत्येक नागरिकाला आहे. बाळासाहेबांनी लोकांमध्ये समाजात दरी निर्माण न करता समाजातील लोकांना एकत्र घेऊन एका विशिष्ट धर्माला घेऊन विशिष्ट काम करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शाखा प्रमुखापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत गेलेल्या नारायण राणेंनी दर्शन घेतल्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शुद्धीकरण करण्यात आले असेल तर शिवसेनेच्या या कोत्या प्रवृत्तीचा निषेध आहे,असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आदिवासी संस्कृतीचे जतन करून विकासकामे करावीत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -