घरमुंबईयुतीच्या सभांची रणनीती ठरली हो... पंतप्रधानांच्या राज्यात होणार ८ सभा

युतीच्या सभांची रणनीती ठरली हो… पंतप्रधानांच्या राज्यात होणार ८ सभा

Subscribe

१ एप्रिलला मोदींची पहिली सभा महाराष्ट्रात होत असून, दोन दिवसात मोदींच्या सभेची जागा निश्चित होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मोदींची शेवटची सभा मुंबईत होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत आता प्रचाराला सुरुवात झाली असून, युती आघाडीच्या सभांना देखील जोर आला आहे. मात्र महाआघाडीपेक्षा सध्या प्रचारात युती आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे युतीने आपल्या सभांचा मास्टर प्लॅन देखील तयार केला आहे. सगळयात महत्वाचे म्हणजे यावेळी शिवसेना भाजपाच्या एकत्रित सभा न होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळवेगळा प्रचार करणार आहेत.

राज्यात मोदींच्या सभांचाही धडाका

राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ सभा होणार असून, महत्वाच्या आठ ठिकाणी मोदींच्या सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये बारामतीमध्ये देखील मोदींची एक सभा ठेवण्याची व्यूहरचना भाजपा आखत आहे. १ एप्रिलला मोदींची पहिली सभा महाराष्ट्रात होत असून, दोन दिवसात मोदींच्या सभेची जागा निश्चित होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मोदींची शेवटची सभा मुंबईत होणार असून, शेवटच्या सभेला मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित व्यासपीठावर दिसणार आहेत.

- Advertisement -

म्हणून युतीचा वेगवेगळा प्रचार

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित सभा न होता हे दोन्ही नेते वेगवेगळे प्रचार करणार आहेत. त्याचे कारण म्हणजे यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता येईल आणि कार्यकर्त्यांचेही मनोमिलन करता येईल. त्यामुळे हे दोन्ही नेते आता वेगवेगळा प्रचार करणार आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -