घरमुंबईदेशात पहिल्यांदाच ठाण्यात रंगणार ‘प्रो दहीहंडी’चा थरार!

देशात पहिल्यांदाच ठाण्यात रंगणार ‘प्रो दहीहंडी’चा थरार!

Subscribe

राज्य सरकारने २०१६ मध्ये यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला होता. याच पार्श्वभूमीवर दहीहंडीचीही स्पर्धा भरवण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. साहसी खेळ म्हणून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ‘प्रो गोविंदा’ रंगणार आहे.

दहीहंडी कशी साजरी करायची? थर किती लावायचे? हा साहसी खेळ की पारंपरिक उत्सव? गोविंदांच्या सुरक्षेची काय उपाययोजना? अशा अनेक प्रश्नांवर दरवर्षी चर्चा होते. दहीहंडीच्या काही दिवस आधी ही चर्चा सुरू होते आणि काही दिवसांनी संपते देखील. दरम्यान, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे इतर खेळांसारखेच सामने का भरवले जाऊ नयेत? ही मागणी जोर धरू लागली. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर ही मागणी मान्य झाली असून मुंबईत आता ‘प्रो कबड्डी लीग’च्या धर्तीवर ‘प्रो गोविंदा’चा थरार रंगणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच रंगणार ‘प्रो गोविंदा’!

आतापर्यंत दहीहंडी हा पारंपरिक उत्सव या स्वरूपात साजरा केला जात होता. मात्र, हळूहळू उत्सवाचं स्वरूप बदलू लागलं. उंचच उंच मानवी मनोरे आणि त्यामध्ये सहभागी होणारे अल्पवयीन गोविंदा यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे हा उत्सव की खेळ हा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन लढ्यानंतर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला. राज्य सरकारने २०१६ मध्ये यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला होता. याच पार्श्वभूमीवर दहीहंडीचीही स्पर्धा भरवण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. साहसी खेळ म्हणून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ‘प्रो गोविंदा’ रंगणार आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – दहीहंडीनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर


कशी असेल ही स्पर्धा?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये ही ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये दहीहंडीच्या दिवशी संध्याकाळी ६ ते १० दरम्यान होणार आहे. यादरम्यान मुंबई-ठाण्यातले एकूण १० मंडळं सहभागी होणार आहेत. सर्वात कमी वेळेत जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी परीक्षक म्हणून हजर असणार आहेत. त्याशिवाय राज्य सरकारचे क्रीडा मंत्री आणि पालकमंत्रीही हजर राहणार आहेत. या स्पर्धेसाठी विशिष्ट अशी नियमावलीही राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश केला. मात्र, त्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली नव्हती. ही नियमावली आता जारी करण्यात आली असून ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो गोविंदा’ ही स्पर्धा दहीहंडीच्या दिवशी संध्याकाळी ६ ते १० या वेळेत भरवण्यात येणार आहे.

आ. प्रताप सरनाईक, दहीहंडी आयोजक

- Advertisement -

काय आहे ‘प्रो गोविंदा’ची नियमावली?

प्रो गोविंदा स्पर्धेत एकूण १० मंडळं निवडण्यात येणार असून, त्यामध्ये मुंबईतील ७ आणि ठाण्यातील ३ मंडळाचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा ८ आणि ९ थरांसाठी असणार आहे. आठ थरांच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना खालून ७ थर, तर ९ थरांच्या स्पर्धेसाठी खालून ८ थर लावता आले पाहिजेत. तसेच कमीत कमी वेळेत हे थर लावयचे आहेत. तसेच वेळ कधी सुरू होईल यावर देखील नियम आहेत. यामध्ये गोविंदांची सुरक्षा देखील पहण्यात आली आहे. जोवर खालचा आणि पहिला थर लागत नाही तोवर वेळ सुरू होणार नाही. जेव्हा पथकाचा प्रशिक्षक बेस पक्का झाल्याचं सांगेल त्यानंतर वेळ सुरू होईल. तसेच ८ वा थर वर जाऊन हात उंचावेल तेव्हा वेळ संपेल. विशेष म्हणजे जे गोविंदा  पथक यशस्वीपणे थर लावून खालीही उतरेल, तेच पुढच्या फेरीत पोहोचणार आहे.

लॉटरी पद्धतीने संघ निवडणार

दहिहंडी गोविंदा समन्वय समितीने गेल्या ४ दिवसांत मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांची पहाणी करून त्यातील १८ गोविंदा पथके निवडली आहेत. यातील फक्त १० गोविंदा पथकं स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे संघ निवडीची प्रक्रिया लॉटरी पद्धतीने लाइव्ह होणार असल्याची माहिती दहिहंडी गोविंदा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरूण पाटील यांनी दिली.


हेही पाहा – FB Live: क्षमतेपेक्षा अधिक थर रचल्यास गोविंदा पथकांवर कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -