घरमुंबई‘एका बाटलीची मजा देईल 5 वर्षांची सजा’ !

‘एका बाटलीची मजा देईल 5 वर्षांची सजा’ !

Subscribe

निवडणूक आयोगाची अशीही जनजागृती

निवडणूक म्हटली की पैशाचे आमिष आणि दारूचा महापूर आलाच. मतदारांना भूलविण्याचे प्रकार सर्रासपणे अनेक निवडणुकीत पहावयास मिळतात आणि मतदार राजा या आमिषाला बळी पडतो. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगानेच दारू आणि पैशाच्या आमिषाविरोधात जनजागृती करीत कल्याणात भव्य फलकबाजी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच असे फलक लावण्यात आल्याने हे फलक लक्षवेधी ठरले आहेत.

‘आमिष थोड्या पैशांचे आणि त्रास पाच वर्षांचा’, ‘एका बाटलीची मजा देईल 5 वर्षांची सजा’ अशा आशयाचे संदेश देणारे मोठ मोठे होर्डिंग्ज कल्याण डोंबिवलीतील प्रमुख चौकांमध्ये पहावयास मिळत आहेत. निवडणूक आयोगातर्फेच हे होल्डींग लावण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणुकीत दारू आणि पैशाचे आमिष दाखवून मतदारांना प्रलोभन दाखवले जाते. गेल्या अनेक निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याचे हे गैरप्रकार वाढीस आले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका, स्वत:च्या मतांची किंमत करू नका, असे आवाहनही या फलकावर करण्यात आले आहे. कोणतीही निवडणूक असो, निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती केली जाते. मात्र, यंदा प्रथमच दारू आणि पैशाला बळी पडू नका, असे आवाहन निवडणूक आयोागातर्फे करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हे होर्डिंग मतदारांचे लक्ष वेधत असून, याचा मतदारांवर किती परिणाम पडतो हेच पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -