घरमुंबईवसईतील गुंडगिरी कायमची मोडून काढणार- उद्धव ठाकरे

वसईतील गुंडगिरी कायमची मोडून काढणार- उद्धव ठाकरे

Subscribe

वसईतील गुंडगिरी कायमची मोडून काढणार, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसई दौर्‍यावर दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी आज वसईतून आपल्या दौर्‍याला सुरूवात केली.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बापाणेजवळ शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.वाघोली नाक्यावर छोटेखानी भाषण कतताना त्यांनी वसईतील गुंडगिरीबाबत त्यांनी वरील विधान केले. या परिसरातील गुंड मला माहित आहे.

मला त्याचे नाव घ्यायचे नाही.ही गुंडगिरी कायमची मोडून काढण्यासाठी आपल्याला जिंकायचे आहे. आपण लढवय्ये सैनिक आहोत आणि सैनिकांसमोर उभे राहण्याची हिंमत गुंडात नसते. घरा-घरात जावून प्रचार करा की,इथल्या गुंडाला कडक शिक्षा करण्यासाठी धनुष्यबाणाला मत द्या.आपण जिंकणारच आहोत. युती झाल्यामुळे समोरचा पक्षच शिल्लक राहिलेला नाही,त्यामुळे लढायचे कुणाशी असा प्रश्न निर्माण झाल्याचेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

- Advertisement -

गावित आपल्या पक्षात आले.त्यांचा अनुभव पाहता त्यांना उमेदवारी देणे स्वाभाविकच होते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे,भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण,आमदार राजेंद्र फाटक,उमेदवार राजेंद्र गावीत, जिल्हा समन्वयक श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या या धावत्या दौर्‍यात उद्धव ठाकरे यांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांची भेट घेतली.सर्वप्रथम त्यांनी अंबाडीरोड येथील गुरुद्वारा,त्यानंतर बाभोळा येथील बिशप हाऊस,वसई किल्ल्यातील चिमाजी आप्पा स्मारक आणि वसईतील दर्ग्यात जावून त्यांनी दर्शन घेतले.बिशप हाऊसमध्ये त्यांनी आर्च बिशप फेलीक्स मच्याडो यांचेही त्यांनी यावेळी आशिर्वाद घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -