घरमुंबईमुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा होणार पुनर्विकास

मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांचा होणार पुनर्विकास

Subscribe

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकासह हार्बर रेल्वेवरील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, जीटीबी या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ‘इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने सल्लागाराची नियुक्ती केली असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. याचबरोबर ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून हार्बर रेल्वेवरील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, जीटीबी या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठीही रेल्वे मंत्रालयाने तत्वतः मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मुंबईतील सर्व खासदारांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा – सीएसएमटी स्थानकावर लोकल बफरला धडकली

- Advertisement -

माटुंगा पूलाचीही होणार दुरुस्ती

सतराव्या लोकसभेत निवडून आलेल्या मुंबईतील खासदारांच्या रेल्वे संदर्भातील सूचना जाणून घेण्यासाठी शुक्रवारी, पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सर्व खासदारांनी रेल्वे प्रशासनाला विविध सूचना दिल्या. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी मांडलेल्या सूचनेला उत्तर देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी दादर रेल्वे स्थानाकासह इतर रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची माहिती दिली. या बैठकीत खासदार शेवाळे यांनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासा व्यतिरिक्त माटुंगा येथील पुलाची दुरुस्ती, रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन, मुंबईतील सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची सद्यस्थिती यासह अनेक मुद्द्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.

दादर रेल्वे स्थानक हे मुंबईतील सगळ्यात जास्त गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचा पुनर्विकास झाल्यास गर्दीचे नियंत्रण होईलच, शिवाय फेरीवाला आणि पार्किंगची समस्याही सुटू शकेल. मंत्रालयाने या पुनर्विकासासाठी सल्लागार नेमून या प्रक्रियेला सुरुवात केली, ही समाधानाची बाब आहे.
– राहुल शेवाळे, खासदार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -