घरताज्या घडामोडीCorona Update: राज्यात १४,४९२ नव्या रुग्णांची नोंद, ३२६ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात १४,४९२ नव्या रुग्णांची नोंद, ३२६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख १४ हजार ८०९ नमुन्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३२ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४६, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा २, वसई विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल २, नाशिक ७, अहमदनगर १७, जळगाव २०, पुणे ५९ पिंपरी चिंचवड मनपा ३६, सोलापूर ३, कोल्हापूर २२, सांगली १५, नागपूर २१ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू पुणे १४, कोल्हापुर ८, ठाणे ४, औरंगाबाद २, जळगाव २ , नाशिक १ आणि सांगली १ असे आहेत. आज १२,२४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,५९,१२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले आहे.

११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईन

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४,१४,८०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,४३,२८९ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Swachh Sarveskshan 2020 : देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -