घरमुंबईमुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राच्या याचिकेवर निकाल ठेवला राखून; अटक बेकायदेशीर

मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राच्या याचिकेवर निकाल ठेवला राखून; अटक बेकायदेशीर

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. राज कुंद्रा आणि त्यांचा सहकारी आणि रयान थोरपे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राज कुंद्रा यांनी मुंबई पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या राज कुंद्रा आणि रयान थोरपे यांच्या याचिकांवर निकाल राखून ठेवला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गुरुवारी न्यायालयाने जामिनावर राज कुंद्रा आणि रयान थोरपे यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. मात्र राज कुंद्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, राज कुंद्रा यांनी सीआरपीसीच्या कलम ४१ (ए) वर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता, म्हणून त्याला अटक करावी लागली होती.

- Advertisement -

असा आहे प्रकार

राज कुंद्रा यांना अश्लील व्हिडिओ बनवून अॅप्सवर अपलोड केल्याप्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. एवढेच नाही तर मुंबई गुन्हे शाखेने राज यांच्या घरावर छापा टाकला जेथे त्यांना सर्व्हर आणि साधारण ७० अश्लील व्हिडिओ आढळून आले. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांचे नाव समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, अभिनेत्री झोया राठोड हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या पॉर्न चित्रपटांच्या गैर मार्गाने होणाऱ्या व्यवसायाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. त्यानंतर तिला देखील चांगलेच ट्रोल केले जात असून असे म्हटले जात आहे की, ती ज्या इंडस्ट्रीचा भाग आहे, तिला देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


राज कुंद्राच्या अटकेबद्दल शिल्पा म्हणाली, ‘मी शांतच, फक्त माझ्या मुलांना यापासून दूर ठेवा’

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -