घरट्रेंडिंग'ओवाळणी दिलीत तर याद राखा'; राज ठाकरेंचा टोला

‘ओवाळणी दिलीत तर याद राखा’; राज ठाकरेंचा टोला

Subscribe

आज खास बलिप्रतिपदेच्या म्हणजेच पाडव्याच्या निमित्ताने राज यांनी साकारलेलं हे नवं व्यंगचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिवाळी विशेष अशा व्यंगचित्रांच्या मालिकेतील, आजचं नवं व्यंगचित्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘ज्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, अशा महाराष्ट्र सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नये’ अशा शब्दांमध्ये राज यांनी त्यांचं पाचवं व्यंगचित्र सादर केलं आहे. या व्यंगचित्रामध्ये त्यांनी शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही साडी नेसलेल्या स्त्रीच्या रुपात दाखवलं आहे. साडी नेसून हे दोघंही पाडव्याच्या निमित्ताने बळीराजाला ओवाळायला आले आहेत. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्याची बायको ‘एेकाsss आत्ताच सांगून ठेवते! एक दमडी जरी टकलीत ओवाळणी म्हणून तर याद राखा!’ अशा शब्दात त्याला खडसावत असल्याचं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. थोडक्यात पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मोजक्या पण मार्मिक शब्दांत भाजपच्या नेत्यांचा  आणि सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. आज खास बलिप्रतिपदेच्या म्हणजेच पाडव्याच्या निमित्ताने राज यांनी साकारलेलं हे नवं व्यंगचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

- Advertisement -

पाहा: राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांना ‘धुतले’

राज ठाकरे ६ ते ९ नोव्हेंबर याकाळात आपल्या व्यंगचित्रांमधून अशाचप्रकारे सत्ताधाऱ्यांचा समाचार घेणार आहेत. धनोत्रयदशीपासूनच या दिवाळी विशेष व्यंगचित्रांच्या मालिकेची त्यांनी सुरुवात केली होती. दिवाळीच्या त्या-त्या दिवसांचं महत्व आणि निमित्त साधत राज ठाकरेंनी ही व्यंगचित्र साकारली. ज्याद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा सर्व बड्या आणि सत्ताधारी नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला. आजच्या बलिप्रतिपदेच्या या व्यंगचित्रानंतर राज यांचं उद्याचं ‘भाऊबीज’ व्यंगचित्र काय असणार, त्यामध्ये कोणाला टार्गेट केलं जाणार? याविषयीची लोकांची उत्सुकता ताणली गेली असणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -