घरमनोरंजनपठाण भावला; राज ठाकरेंकडून शाहरुखला बुके?

पठाण भावला; राज ठाकरेंकडून शाहरुखला बुके?

Subscribe

अखेर गेल्या महिन्यात चित्रपट प्रदर्शित झाला. वाद असलेल्या दृश्यांना कात्री न लावता चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या चार दिवसांतच प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले. चित्रपटाने रग्गड कमाई केली. विरोध करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याचा दावा करण्यात आला. सर्वांनीच या चित्रपटाचे व शाहरुखच्या अभिनयाचे कौतुक केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शाहरुख व दिपिकाला बुके पाठवल्याचा दावा एका खासगी वृत्त वाहिनीने केला आहे.

 

मुंबईः अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री दिपिका पदुकोणला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुष्पगुच्छ पाठवल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एका खासगी वृत्त वाहिनीच्या आधारे या वृत्ताची चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

पठाण चित्रपटातून अभिनेता शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. मात्र या चित्रपटातील दिपिकाच्या बिकनीच्या रंगावरुन वाद झाला होता. बॉयकॉट पठाण अशी मोहिम सोशल मिडियावर सुरु झाली होती. या चित्रपटातील काही दृश्य वगळण्याची सूचना चित्रपट मंडळाने केल्याचे बोलले जात होते. अभिनेता शाहरुख खानने माघार घेतली नाही. माझ्यावर जगभरात प्रेम करणारे आहेत. तुम्ही कितीही विरोध करा, असे कोलकाता येथील चित्रपट महोत्सवात शाहरुखने विरोध करणाऱ्यांना सुनावले होते. तरीही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहा बाहेर लागलेले पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडले. त्यावरुनही वाद झाला होता.

अखेर गेल्या महिन्यात चित्रपट प्रदर्शित झाला. वाद असलेल्या दृश्यांना कात्री न लावता चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या चार दिवसांतच प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले. चित्रपटाने रग्गड कमाई केली. विरोध करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याचा दावा करण्यात आला. सर्वांनीच या चित्रपटाचे व शाहरुखच्या अभिनयाचे कौतुक केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शाहरुख व दिपिकाला बुके पाठवल्याचा दावा एका खासगी वृत्त वाहिनीने केला आहे. या बुकेसोबत राज यांनी कौतुकाची थाप देणारा संदेशही लिहून पाठवल्याचे वृत्त आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

- Advertisement -

पठाण चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा वाळवी व बांबू चित्रपटही प्रदर्शित झाला होता. मात्र पठाणमुळे या दोन्ही मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नव्हते. त्यामुळे मनसे आक्रमक झाली होती. मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळाली नाही तर आम्ही येऊन बांबू लावूच असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला होता.

तसेच याआधी रईस चित्रपटाच्या प्रदर्शनालाही मनसेने विरोध केला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान शाहरुख सोबत मुख्य भूमिकेत होती. त्याला मनसेने विरोध केला होता. त्यावेळी शाहरुखने कृष्णकुंजवर जाऊन राज यांची भेट घेतली होती. रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माहिरा भारतात येणार नाही, अशी हमी शाहरुखने दिली होती. त्यानंतर मनसेचा विरोध निवळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -