Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी महापालिकेच्या एल विभागातील जलवाहिनीचे पुनर्वसन, मजबुतीकरण पूर्ण

महापालिकेच्या एल विभागातील जलवाहिनीचे पुनर्वसन, मजबुतीकरण पूर्ण

Subscribe

मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या महापालिकेच्या एल विभागातील खैरानी रस्ता येथील जलवाहिनीच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ८०० मीटर लांब जलवाहिनी ही अत्याधुन‍िक 'सीआयपीपी' तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्त करण्याचे आव्हानात्मक काम महापालिकेने पूर्ण केले आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या महापालिकेच्या एल विभागातील खैरानी रस्ता येथील जलवाहिनीच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ८०० मीटर लांब जलवाहिनी ही अत्याधुन‍िक ‘सीआयपीपी’ तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्त करण्याचे आव्हानात्मक काम महापालिकेने पूर्ण केले आहे. अरुंद जागेत असलेली ही जलवाहिनी टप्प्याटप्याने दुरुस्त केल्याने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवता आला, सोबतच मजबुतीकरण झाल्याने आता या जलवाहिनीची क्षमता आणि आयुर्मान देखील वाढले आहे. (Rehabilitation and strengthening of water channel in L section of the Municipal Corporation is complete)

खैरानी रस्ता येथे सुमारे ३० वर्षांपासून असलेल्या भूमिगत १,२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला (असल्फा आऊटलेट) मागील काही द‍िवसांपासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. खैरानी रस्ता पर‍िसर अत‍िशय अरुंद आण‍ि वाहतुकीची वर्दळ असलेला आहे. एवढेच नव्हे तर, एल विभागात संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण रस्ता, जोश नगर, आजाद मार्केट यासह अनेक पर‍िसराला या जलवाह‍िनीने पाणीपुरवठा केला जातो. अशा स्थितीत, या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सलग हाती घेणे देखील शक्य नव्हते कारण त्यातून परिसरातील रहिवाशांची प्रचंड गैरसाय झाली असती.

- Advertisement -

या अडचणी असल्या तरी, जलवाहिनीचे पुनर्वसन करण्याशिवाय समोर पर्याय नव्हता. जल अभियंता खाते अंतर्गत, उप जल अभियंता (परिरक्षण) उपव‍िभागाने खैरानी रस्ता जलवाहिनीवरून दर शनिवारी दहा आठवडे शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवून टप्प्याटप्प्याने जलवाहिनी दुरुस्ती काम हाती घेतले. अखेर काल हे काम पूर्ण झाले. उप जल अभियंता (परिरक्षण) व‍िभागातील कुशल अभ‍ियंता आण‍ि कामगारांनी प्रत्येक शनिवारी सुमारे ८० मीटर लांब जलवाहिनीचे पुनर्वसन, मजबुतीकरण काम केले. अशाप्रकारे सलग दहा शन‍िवारी काम करून संपूर्ण ८०० मीटर मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आता या भागातील पाणीपुरवठा सुरळीत असून, नागरिकांची कोणतीही गैरसोय न करता ही मोहीम पूर्ण करण्यात आली.

सीआयपीपी तंत्रज्ञान म्हणजे काय?

- Advertisement -

ज्या भागातील जलवाह‍िनी भौगोल‍िक आण‍ि वाहतुकीच्या कारणास्तव बदलणे शक्य नसते, अशा ठ‍िकाणी सीआयपीपी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अनेक वर्ष सततच्या वापरामुळे जलवाह‍िन्यांना गंज चढतो. त्यामुळे पाणी वाहून नेण्यात अडथळा न‍िर्माण होतो आण‍ि जलवाह‍िनीला गळली लागते. असल्फा आउटलेटमध्येही हीच समस्या होती. त्यामुळे सुरुवातीला या जलवाह‍िनीतील गंज पूर्णपणे काढून नंतर त्यावर रासायन‍िक पदार्थांचा मुलामा देण्यात आला. त्यानंतर जलवाह‍िनीतून रबरी आवरण सोडून त्यात हवा भरण्यात आली. हवा भरल्यानंतर हे रबरी आवरण जलवाह‍िनीला च‍िकटले. हे आवरण च‍िकटल्यानंतर हवा काढण्यात आली. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने सीआयपीपी तंत्रज्ञानाच्या आधारे हे काम पूर्ण करण्यात आले.


हेही वाचा – नव्या संसद भवनातील सगळं फर्निचर मुंबईत तयार; वाचा सविस्तर

- Advertisment -