घरक्रीडाIPL 2023 FINAl : पावसाचा धोका टळला; गुजरातवर दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा दबाव

IPL 2023 FINAl : पावसाचा धोका टळला; गुजरातवर दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा दबाव

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामाच अंतिम सामना आज होणार आहे. चारवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि गतवर्षीचा आयपीएल विजेता गुजरात टायटन्स संघ या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यावर पावसाचे संकट निर्माण झाले होते, परंतु सध्या तरी पावसाचा धोका टळला असला तरी गरज पडल्यास आम्ही सुपर ओव्हर घेऊ, अशी माहिती आयपीएल चेअरमन यांनी दिली आहे. दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे तर दोन्ही संघ आज संध्याकाळी 7:30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर  आमनेसामने येणार आहेत.

अहमदाबादच्या आसपासच्या भागात सकाळपासून पाऊस पडत होता. याशिवाय हवामान विभागानेही दोन दिवस पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणाऱ्या आयपीएलच्या महामुकाबल्यावर पावसाचा परिणाम होणार का? असा प्रश्न दोन्ही संघाच्या चाहत्यांना पडला होता. मात्र आज सकाळपासूनच आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे सामन्यावरील पावसाचे काळे ढग दूर झाले आहेत. अहमदाबादमध्ये सध्या आकाश ढगाळ असले तरी रिमझिम सरी पडण्याची शक्यता आहे. याशिवाय आजूबाजूच्या भागात पडणारा पाऊस लक्षात घेता सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना पावसाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वक्तव्य केले की, आम्ही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी सामन्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत आम्ही वाट पाहू आणि गरज पडल्यास सुपर ओव्हरमध्येही अंतिम सामन्याचा निकाल लावू शकतो.

गुजरातवर दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा दबाव
गेल्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्स नव्याने आयपीएलशी जोडला गेला. गेल्या हंगामात चांगली कामगिरी करत अंतिम सामन्यातपर्यंत मजल मारत विजेतेपद पटकावले आणि सर्वांना आश्चर्यचकीत केले. या हंगामातही आपला फॉर्म कायम राखत अंतिम सामन्यात दिमाखात एन्ट्री केली आहे. परंतु गुजरात संघासमोर चार वेळा आयपीएल जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघावर दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा दबाव नक्कीच असेल.

- Advertisement -

या हंगामातील कामगिरी
गुजरात टायटन्स संघाने या हंगामात लीग सामन्यातील 14 आणि क्वालिफायरचे दोन सामने खेळले आहेत. यातील 11 सामने जिंकताना गुजरातला 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात संघामध्ये डेव्हिड मिलर, राशिद खान, नूर अहमद आणि जोशुआ लिटल हे परदेशी खेळाडू आणि मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. शुभमन गिलने तर या हंगामात तीन शतके मारताना 851 धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातसुद्धा तो आपला फॉर्म राखत पुन्हा एकदा शतक करतो का हे पाहावे लागले. याशिवाय मोहम्मद शमी (28), राशिद खान (27) आणि मोहित शर्मा (24) यांनी या हंगामात चांगली गोलदाजी करताना सर्वाधिक विकेट घेत पहिले तीन क्रमांक आपल्याकडे राखून ठेवले आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जसाठी हे चारही खेळाडू आव्हान ठरताना दिसणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -