MPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा! ३४० पदांची अतिरिक्त भरती करणार

new clerk grade 3 post will be fill by mpsc cm eknath shinde cabinet takes decision on it maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. २१ तारखेला पूर्व परिक्षा होणार आहे. ही परीक्षा फक्त १६१ पदांकरता घेण्यात येणार होती. मात्र, आता पदभरतीची संख्या वाढली आहे. आता त्यात ३४० पदांची संख्या वाढवली आहे. ११ मे २०२२ रोजी एमपीएससीने १६१ पदांची भरती काढली होती, त्यानंतर आता पुन्हा ३४० पदांची भरती काढली आहे. म्हणजेच, एकूण ५०१ पदांसाठी परीक्षा होणार आहे.

या पदांकरता होणार परीक्षा

 •  उपजिल्हाधिकारी,गट अ-33,
 • पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
 • सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
 • उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
 • उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
 • शिक्षणाधिकारी, गट अ-20
 • प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
 • तहसीलदार, गट अ-25
 • सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
 • उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
 • सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
 • उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
 • सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42
 • एकूण – 340


या ५०१ पदांसाठी एमपीएससी पूर्व परीक्षा २१ ऑगस्ट रोजी घेणार आहे. ३७ जिल्हा केंद्रांवर २१ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. 19 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 544 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 344 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.