घरमुंबईकॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने उद्योगांना दिलासा - मुख्यमंत्री

कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने उद्योगांना दिलासा – मुख्यमंत्री

Subscribe

'केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कार्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केल्यामुळे उद्योग जगतात आनंदाचे वातावरण पसरले असून उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कार्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केल्यामुळे उद्योग जगतात आनंदाचे वातावरण पसरले असून उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे कंपन्यांची परिस्थिती सुधारले आणि बाजारात मागणी देखील वाढेल, अशी शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच जर सगळ्यात बोल्ड निर्णय कोणता असेल तर तो कॉर्पोरेट टॅक्सचा निर्णय असेल’, असे देखील मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले आहे.

हा निर्णय महत्वाचा  ठरणार

या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन याचा जास्त फायदा महाराष्ट्राला होणार आहे. कार्पोरेट टॅक्सच्या निर्णयामुळे रि इन्व्हेस्टमेंटमध्ये अधिक नोकऱ्या तयार होतील. ज्यामुळे बेरोजगारांना याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या नवीन गुंतवणूक येणार आहेत. त्या नवीन गुंतवणूकिला १५ टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय हा महत्वाचा ठरणार आहे. यामुळे २०२३ मध्ये प्रोडक्शनमध्ये जायचे असेल तर सगळी गुंगवणूक ही २०१९, २०२० आणि फार फार तर २०२१ मध्ये करावी लागेल. तसेच गेल्या काही महिन्यामध्ये नवीन सरकारने अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे १० बँकाचे ४ बँकामध्ये विलीनीकरण हा देखील एक मोठा निर्णय महत्वाचा आहे.

- Advertisement -

राणे अजूनही होल्डवर

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश कधी करणार?, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु असतानाच ‘नारायण राणेंबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ’,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

आरे संदर्भात विरोधकांना टोला

‘आरेमध्ये होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २ हजार ७०० झाडे तोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईकर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असताना आज पुन्हा एकदा आरे संदर्भातला मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. दरम्यान, फडणवीस यांनी आरेला विरोध करणाऱ्यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. ‘कारशेडला विरोध करणारे वेगळ्या मनसुब्याने काम करत आहेत का? हे तपासून पहायला हवे’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आरेच्या बाबतीत योग्य माहिती घेत आहोत’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -