घरमुंबईमुंबईला हरित शहर करण्याचा संकल्प, लवकरच जाहीर करणार मार्गदर्शक तत्वे

मुंबईला हरित शहर करण्याचा संकल्प, लवकरच जाहीर करणार मार्गदर्शक तत्वे

Subscribe

मुंबई : मुंबईत शास्त्रोक्त पद्धतीने हरिती शहर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे असलेली पुस्तिका लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून मुंबईला हरित शहर बनविण्याचा संकल्प महापालिका उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी मांडला.

मुंबईत प्रत्येक घरापासून ते प्रत्येक मोकळ्या सार्वजनिक जागेपर्यंत सर्वत्र हरित आच्छादन व हरित क्षेत्र वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग लाभावा, त्यादृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी महापालिकेचे उद्यान विभाग, संबंधित भागधारक आणि विषय तज्ज्ञांच्या उपस्थितीत ८ मार्च रोजी राणीच्या बागेत एक चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात सर्व संबंधितांची मते, अभिप्राय, सूचना, विचार संकलित करुन, त्यास अंतिम रुप देऊन येत्या सहा महिन्यांच्या आत ही पुस्तिका प्रकाशित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाने वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील राणीच्या बागेत मुंबईतील विविध संस्थांसोबत या विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध विभागांचे अधिकारी, हरित तज्ज्ञ, वास्तु तज्ज्ञ, विकासक संघटना, आरेखक (डिझायनर), कॉर्पोरेट्स, देणगीदार, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते.

दरवर्षी पावसाळापूर्व कालावधीत नागरिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्था सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) अंतर्गत वृक्षलागवडीचे उपक्रम राबवतात. अशा प्रयत्नांना शास्त्रोक्त पद्धतीची जोड मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या हरित शहर तत्त्वांचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शनाची अनेकांना गरज भासते. त्या दिशेने विचार करता महापालिकेच्या मदतीने हरित आच्छादन आणि जैवविविधता वाढविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याचा शोध घेणे, हा या बैठकीचा उद्देश होता.

- Advertisement -

मुंबईला हरित शहर बनविण्याचा संकल्प
राणीच्या बागेत आयोजित चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना महापालिकेचे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी म्हणाले की, “मुंबई महानगरासाठी प्रत्येक परिसरामध्ये हरित क्षेत्र संवर्धनाचे लक्ष्य निश्चित केले असून ते लक्ष्य गाठण्यासाठी विशेष संकल्पना, नावीण्यपूर्ण उपक्रम, सहजपणे राबवणे शक्य होईल अशा गोष्टींची गरज आहे. त्यामुळे हरित क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये चर्चा घडवून मुंबई महानगर ‘हरित शहर’ बनवण्याची नागरी जबाबदारी पार पाडण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्या सहकार्याने मुंबईत हरितीकरण शक्य असलेल्या मोकळ्या व सार्वजनिक लहानसहान जागा शोधणे, महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर नागरिकांना स्थानिक प्रजातीची रोपे उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य अशा बाबी तत्काळ सुरु करण्यात येणार आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उभ्या मांडणीची उद्याने (व्हर्टिकल गार्डन ऍण्ड ग्रीनिंग), गच्चीवरील उद्याने (टेरेस गार्डनिंग) आणि इमारतीच्या भूखंडावर योग्य तेथे हरितीकरण करताना योग्य नियमावली असली पाहिजे, असे मत या बैठकीत सहभागी अनेक मान्यवरांनी मांडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -