घरमुंबईमुद्रांक शुल्कातून पालिकांच्या तिजोरीत आर्थिक भर

मुद्रांक शुल्कातून पालिकांच्या तिजोरीत आर्थिक भर

Subscribe

राज्य शासनाकडून 231 कोटी रुपयांचा महसूल होणार जमा

राज्य सरकारने मुद्रांक शुल्क अधिभारातून जमा होणारी रक्कम राज्यातील 26 महापालिकांना वितरीत करण्याचे आदेश सोमवारी राज्य शासनाने काढले. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या तिजोरीत सुमारे 231 कोटी 60 लाख 96 हजार 291 रुपयांचा महसूल जमा होणार आहे. ठाणे जिल्हयातील महापालिकांमध्ये सर्वाधिक वाटा ठाणे महापालिका 36 कोटी 49 लाख त्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिका 18 कोटी 40 लाख रुपये आहे. त्यामुळे पालिकांच्या तिजोरीत कोट्यवधीची भर पडणार आहे.

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एलबीटी लागू केल्यानंतर त्यांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम होऊ नये, याकरता मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावण्यात आला होता. मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभाराद्वारे सरकारकडे जमा होणारा निधी संबंधित महापालिकांना वितरित करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. डिसेंबर 2018 आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये झालेल्या व्यवहारांवरील अधिभारासाठी सर्व महापालिकांना दोनशे एकतीस कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. त्यामध्ये, सर्वाधिक 51 कोटी 29 लाख रुपयांचा वाटा पुणे महापालिकेला मिळणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घरबांधणी होत असल्याने सरकारकडे मुद्रांक शुल्काद्वारे मोठा महसूल गोळा होतो. ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये मुद्रांक शुल्काचा सर्वाधिक वाटा हा ठाणे महापालिकेचा आहे. त्या खालोखाल कल्याण डोंबिवली महापालिकेचा नंबर लागतो. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत मोठया प्रमाणात घर खरेदी होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

केडीएमसीला आर्थिक आधार

कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्याशिवाय यापुढे एकही फाईल मंजूर करता येणार नाही, अशी भूमिका पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतली असून नवीन कामांना ब्रेक लावला आहे. तसे आदेश आयुक्तांनी सर्व विभागांना दिले आहेत. मुद्रांक शुल्काची दोन महिन्याची सुमारे 18 कोटी 40 लाख रूपये आर्थिक भर महापालिकेच्या तिजोरीत पडणार असल्याने केडीएमसीला दिलासा मिळणार आहे.

महापालिकेचे नाव                  देय रक्कम

नागपूर               —-         12, 70, 73, 098
चंद्रपूर               —-          97, 1008
अमरावती           —           28, 76,1017
औरंगाबाद           —          37,92,4840
लातूर                —          7,75,582
नांदेड वाघेळा       —           1, 13, 89570
नाशिक             —          10, 64, 97, 826
मालेगाव            —          18,57,214
जळगाव            —          1, 47, 74, 260
अहमदनगर        —          1, 29, 91, 864
पुणे                 —          51, 29, 40, 084
पिंपरी चिंचवड     —          25, 87, 34, 368
कोल्हापूर          —         1, 91, 29, 108
सांगली             —         1, 76, 99, 290
मिरा भाईंदर       —         17, 23, 63,633
वसई विरार        —         13,91,50,359
भिवंडी निजामपूर  —         20,55, 1209
उल्हासनगर       —         98,21,455
कल्याण डोंबिवली  —       18,40,15,534
ठाणे                —         36,49,51,016
नवी मुंबई          —        16,45,13,102
पनवेल           —          10,92,10,854

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -