घरमुंबईरिक्षा- टॅक्सी भाडेवाढ झाली, पण नवा मीटर घ्यायचा कसा?

रिक्षा- टॅक्सी भाडेवाढ झाली, पण नवा मीटर घ्यायचा कसा?

Subscribe

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे प्रवासी संख्येत मोठ्याप्रमाणात घट होत आहे. अशातच पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि आता रिक्षा टॅक्सी भाडेवाढीमुळे सामान्य मुंबईकर मेटाकुटीला आला आहे. मात्र आतील रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय रिक्षा चालक मालक संघटनांना कुठेतरी दिलासाजण ठरला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील अनेक रिक्षा, टॅक्सी चालकांनी आता नव्या दरवाढीनुसार भाडे घेण्यास सुरुवात केली आहे. तर काही चालकांनी मीटर बदलण्यास तीन महिन्यांचा अवधी देण्यात आल्याने मीटरमध्ये बदल केल्यानंतर सुधारित भाडे आकारु असा पवित्र घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी दरवाढीचा घेतलेला निर्णय काही चालकांसमोर नवे आव्हान उभे करुन गेला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने सामान्य मुंबईकर प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे रेल्वे, एसटी, बेस्ट प्रवासाकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. याचा परिणाम रिक्षा टॅक्सी प्रवासावरही होत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी १ मार्चपासून मुंबईत उपनगरातील रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ जाहीर केली. मात्र नव्या दरवाढीनुसार भाडे घेण्यास सुरुवात केली तर प्रवासी रिक्षा टॅक्सी प्रवासाकडे पाठ फिरवतील अशी भीती संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या चालकांना मदत करण्याचे आवाहन रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत आहे. मुंबईत आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांनी नवा मीटरसाठीचा ५०० ते १००० रुपये हा खर्च परवडत नसल्याने अनेक चालक जुन्या दरनुसार भाडं आकारात आहेत. त्यामुळे सध्या नव्या भाडेवाढीनुसार भाडे आकारणाऱ्या चालकांचे प्रमाण कमी आहे. लॉकडाऊनमध्ये आधीच मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली. अनेक रिक्षा, टॅक्सी चालकांचे वाहन हे लोनवर घेतलेले आहे.एकंदरीत महिन्याच्या आर्थिक बजेटमध्ये मीटरचा खर्च बसवणे अनेक चालकांसमोर आव्हान ठरत आहे. मुंबईत सध्या रिक्षांची संख्या साडेचार लाखांहून अधिक असून टॅक्सीची संख्या ७० हजारांहून अधिक आहे. मात्र या वाहनसंख्येच्या तुलनेत मीटरमध्ये बदल करणे अर्थात मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत कॅलिब्रेशन करण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मीटरचा हा महागडा खर्च चालकांना करणे सध्या शक्य नसल्याने सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा- pooja chavan suicide- मी फक्त तिला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप, मोबाईलबद्दल माहित नाही – भाजप नगरसेवक

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -