घरमुंबईआरपीएफ जवानांनी १२ महिन्यांत १४१ पळून आलेल्या मुलांची केली सुटका

आरपीएफ जवानांनी १२ महिन्यांत १४१ पळून आलेल्या मुलांची केली सुटका

Subscribe

मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) मागील १२ महिन्यांत मुंबईतील मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून आत्तापपर्यंत १४१ मुलांना वाचवले आहे. या मुलांना त्यांच्या पालकांच्या हाती सुखरूप सोपवण्यात आले आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाने १४१ मुलांची सुटका केली असून त्यात मुंबईच्या मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांमधील ९२ मुले आणि ४९ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून देण्यात आली. मागील पाच वर्षांत म्हणजेच २०१६ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १,८७४ मुलांना वाचविण्यात आले.

वाद विवादांमुळे, कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले आयुष्य जगण्यासाठी अथवा मोहमयेच्या वातावरणाच्या शोधात या १४१ पैकी बहुतेक मुले आपल्या कुटुंबियांना कसलीही माहिती न देता मुंबईत आली. यातील अनेक मुलेही प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ घुटमळताना आढळली. या मुलांबाबत जेव्हा प्रशिक्षित रेल्वे संरक्षण दलाला माहिती मिळाली तेव्हा त्या मुलांना आरपीएफ जवानांनी ताब्यात घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यानंतर त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरुप सोपवण्यात आले. त्यामुळे या मुलांना पालकांपर्यंत पोहचवण्यात रेल्वे संरक्षण दलाने सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

- Advertisement -

यातील एका घटनेत, एक १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी वडिल ओरडल्यामुळे, नागपाडा, मुंबई येथील राहत्या घरातून पळून गेली. दरम्यान ३० डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ती मुलगी शीव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर सापडली. यावेळी आरपीएफ कॉन्स्टेबल एस. एन. शिंदे व आरपीएफ निरीक्षक सुंदरसिंग प्रजापती यांना ही घाबरलेली मुलगी फिरत असल्याचे आढळले. तिच्याकडे चौकशी केली असता, आपल्या वडिलांच्या भीतीपोटी ती घरातून पळाल्याचे सांगितले, तिचे समुपदेशन केले आणि तिला दादरच्या आरपीएफ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. नंतर, आरपीएफ अधिका-यांनी शहर पोलिसांच्या सहकार्याने अल्पवयीन मुलीला तिच्या चिंताग्रस्त पालकांकडे सुखरुप सोपवण्यात आले आहे. मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाने घरातून पळून आलेल्या मुलांना आपल्या कुटूंबियात पुन्हा एकत्र करण्याच्या घटनांपैकी ही एक आहे, यामुळे काळजीत असलेल्या पालकांच्या चेह-यावर हास्य उमटते. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणाहून काही लहान मुले पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -