घरमुंबईअंधेरी पोटनिवडणुकीतील विजय रमेश लटकेंच्या कार्याचा, निष्ठेचा; आदित्य ठाकरेंचं ट्विट

अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय रमेश लटकेंच्या कार्याचा, निष्ठेचा; आदित्य ठाकरेंचं ट्विट

Subscribe

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके 66,247 मतांनी विजयी झाल्या. दरम्यान या विजयानंतर ऋतुजा लटके या उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. यातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांच्या विजयावर पहिलं ट्विट केलं आहे. आजचा अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय रमेश लटके यांच्या कार्याचा आणि निष्ठेचा असल्याचे म्हणत या विजयातून निर्माण झालेल्या उर्जेची वाट महाराष्ट्रभर पसरेल अशी खात्री जाहीर केली आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी ठाकरे गटाची हीच मशाल आता संपूर्ण मुंबईभर आणि महाराष्ट्राभर धगधगणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्विट नेमक काय?

आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे!
ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे! असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंच्या ट्वविटमधून अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयाच्या आनंदाबरोबरचं आगामी मुंबई आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ठाकरे गट मशाल चिन्हासह तयारीला लागल्याचे सूचित करत आहे.

- Advertisement -

सूनबाईंच्या विजयी वाटचालीवर रमेश लटकेंचे वडिलांना आली लेकाची आठवण म्हणाले….


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -