घरमनोरंजनचर्चबाहेरील सूचना फलक पोस्ट करत शरद पोंक्षे म्हणाले, पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने...

चर्चबाहेरील सूचना फलक पोस्ट करत शरद पोंक्षे म्हणाले, पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने…

Subscribe

सध्या राज्यात टिकलीवरून वाद सुरू आहे. या वादात शरद पोंक्षे यांनी टिकलीचा उल्लेख न करता उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टवर असंख्य कॉमेंट्स आले आहेत. 

मुंबई – सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयांत आपलं परखड मत मांडणाऱ्या अभिनेते शरद पोंक्षे यांनी आता पुन्हा एकदा एक वाद छेडला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत निशाणा साधला आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या टिकली वादावरून त्यांनी ही उपहासात्मक पोस्ट टाकली आहे का असाही प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे.

हेही वाचा तुझी अश्लील अदाकारी बघायला कोणालाही आवडणार नाही! लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी घेतली गौतमीची शाळा

- Advertisement -

शरद पोंक्षे यांच्या पोस्टमध्ये काय?

एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. इथे स्लिवलेस,शॉर्ट्स, क्रॉप टॉप किंवा मिनी घालून गेल्यास पाद्री कपडे बदलून या मगच सोडेन असे सांगतात.

- Advertisement -

पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही.सद्य स्थितीशी ह्याचा काहीही संबंध नाही फक्त जे वाटल दिसल ते पोस्ट केलं.


सध्या राज्यात टिकलीवरून वाद सुरू आहे. या वादात शरद पोंक्षे यांनी टिकलीचा उल्लेख न करता उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टवर असंख्य कॉमेंट्स आले आहेत.

हा फोटो Goa येथील cathedral चा आहे. शिवाय आत गेल्यावर फोटो काढू नका वगैरे वगैरे नियम सगळे हिंदू बांधव निमुटपणे ऐकतात. पण तिथे स्त्री अस्मिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या गोष्टी विचारायला धाडस होत नाही. एवढेच काय, मशिदीत स्त्रीयांना मज्जाव का, हा प्रश्न तरी विचारा म्हणावं पत्रकारांना, अशी एका नेटिझनने त्यांच्या पोस्टखाली कॉमेंट केली आहे.

हेही वाचा – जयवंत वाडकर उर्फ आनंदयात्री ‘वाड्या’!

एकीकडे शरद पोंक्षे यांच्या समर्थनार्थ कॉमेंट्स येत असताना काहींनी त्यांना विरोध कराणारेही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटिझनने म्हटलं आहे की, ‘अगोदर उगडे नागडे, कळकट, मळकट ढेरपोटे पुजारी आणि भटजींना अंगभर कपडे घालायचं कंपल्सरी केलं पाहिजे. किती किळसवाणे दिसतं ते. लोकांच्या लेकीबाळी मंदिरात देवदर्शनासाठी येतात.’

तर एका फेसबूक वापरकर्त्याने शरद पोंक्षे यांच्या या पोस्टचा थेट टिकलीशी संबंध जोडला, ती वापरकर्ती म्हणाली की, पुण्यात असे मठ आहेत, जिथे जिथे कुंकू आणि पूर्ण कपडे लागतात अंगावर. जीन्स आणि बेल्ट चालत नाही. आम्ही जातो तिथे आणि सगळं पाळून जातो. मी स्वतः कधीही कोणत्याही देव किंवा देवीच्या मंदिरात पाश्चात्य कपडे घालून गेली नाही. याबद्दल तक्रार नव्हती आणि नसेन. राग उद्दामपणाचा आहे. तो प्रश्न तिथे गरजेचा नव्हता. तेच ती अशा ठिकाणी बिन टिकली आली असती तर हा स्टँड योग्य होता, सार्वजनिक ठिकाणी नाही.

टिकली प्रकरण सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी आणखी एक पोस्ट केली होती. यातही त्यांनी टिकली प्रकरणाचा उल्लेख न करता टिका करणाऱ्यांना प्रत्यूत्तर दिलं होतं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -