घरताज्या घडामोडीसचिन वाझेंचा पाठलाग करणारी ती MH 45 7W 4887 गाडी कोणाची?

सचिन वाझेंचा पाठलाग करणारी ती MH 45 7W 4887 गाडी कोणाची?

Subscribe

ठाण्यातील व्यावसाय़िक मनसुख हिरेन याच्या हत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले सचिन वाझे यांनी त्यांचा पाठलाग होत असल्याचा दावा केला आहे. एक गाडी सतत माझ्या मागावर असून त्या गाडीचा क्रमांकही बनावट असल्याचे वाझे यांनी म्हटले आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. मनसुख वाझेंच्या संपर्कात होते. त्यामुळे साहजिकच संशयाची सुई वाझेंकडेच आहे. त्यातच मनसुख यांची हत्या वाझेंनीच केल्याचा आरोप मनसुख यांच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणाच्या सुरुवातीपासूनच वाझे विरोधकांच्या निशाण्यावर होते. पण आता मनसुख यांच्या पत्नीने जबाबातच वाझे यांचे नाव घेतले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ नक्कीच झाली आहे. त्यातच सचिन वाझे प्रकरणावर अधिवेशनातही भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर वाझे यांची सीआययुच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पण याच दरम्यान, सचिन वाझे यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली व पोलिसांचा बोर्ड लावलेली गाडी आपला पाठलाग करत असल्याचे सांगितले. लवकरच याबाबत मिडियाशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

MH 45 7W 4887 क्रमांक असलेली गाडी आपल्या मागावर असल्याचे वाझे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे वाझेंचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या गाडीत अनेक नंबर प्लेटही सापडल्या आहेत. ही गाडी एटीएसची असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -