घरमुंबईजुने स्वप्न पूर्ण होण्यासाठी संजय राऊत वारंवार भाजपा नेत्यांवर...; नितेश राणे यांची...

जुने स्वप्न पूर्ण होण्यासाठी संजय राऊत वारंवार भाजपा नेत्यांवर…; नितेश राणे यांची टीका

Subscribe

मुंबई : संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा दाखला देत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांचा भाषण माफिया असा उल्लेख केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांचा लँड माफिया असा उल्लेख करत जोरदार टोला लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले की, कैदी नंबर 8959  (संजय राऊत) ने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषमध्ये कैदी नंबर 89-59 संजय राजाराम राऊत यांनी परत एकदा भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रमुख नेते देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर आणि इतर प्रमुख नेत्यांवर तोंडसुख घेतले आहे. कैदी नंबर 8959 संजय राजाराम राऊत यांची इच्छा आहे की, मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडत राहावे. जेणेकरून त्यांचे जुने स्वप्न पूर्ण व्हावे. मी पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितले संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर आरोप करणे बंद केले नाही तर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडत राहणार असे सांगितले होते, पण तरीही संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना भाषण माफिया म्हटले आहे. भाषण माफिया एका तोंडाने बोलत असताना तु किती मोठा लँड माफिया आहेस, याचे काही पुरावे मी मुद्दामहुन महाराष्ट्राला देऊ का? असा प्रश्न मला संजय राजाराम राऊत यांना विचारायचा आहे, असा टोला नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला.

- Advertisement -

अलिबागमध्ये दमदाटी करून जमीन बळकावली
अलिबागच्या केईम बीचवर संजय राऊत यांना जमीन पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी एका मराठी कुटुंबाला दमदाटी करून ती जमीन बळकावली. उशीरकर नावाच्या कुटुंबाकडून दमदाटी करून जमीन घेतली आणि केईम बीचवर रेसॉर्ट बांधण्याचे संजय राऊत यांचे मनसुबे होते. त्यासाठी कोट्यावधीची जमीन अवघ्या काही 10-20 कोटीमध्ये घेतली. मग दुसऱ्यांना माफिया म्हणणारा हा किती मोठा लँड माफिया आहे, याचे उत्तर महाराष्ट्राला संजय राऊत यांनी दिले पाहिजे. भांडूप, विक्रोळी या परिसरामध्ये आर वरून सुरू होणाऱ्या बिल्डरांसोबत संजय राऊत यांची भागिदारी आहे, त्या निमित्ताने त्यांनी किती लोकांच्या जमीनी बळकावल्या आहेत. आमच्या नेत्यांवर तोंडसुख घेण्याअगोदर याचेही उत्तर लँड माफियाने द्यावे, असे नितेश राणे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -