घरमुंबईजोडीदार निवडता तसा उमेदवार निवडा

जोडीदार निवडता तसा उमेदवार निवडा

Subscribe

निर्माता-राहुल भंडारे…

मुला-मुलीचे लग्न जरी ठरवायचे झाले तरी आई-वडील जागृत राहुन वधू-वराची चौकशी करत असतात. मग मतदान करताना याच पालकवर्गाने, युवकांनी बेफिकीर राहुन कसे चालेल? आयुष्याचा जोडीदार निवडता तसा उमेदवार निवडा. आपले मत फुकट जाणार नाही याची काळजी प्रत्येक मतदाराने घ्यायला हवी.

- Advertisement -

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु, त्यांच्यासाठी सरकार काही करत नाही असे माझे म्हणणे आहे. नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये त्यांना सुविधा द्यायला हव्यात. गुणवत्तेप्रमाणे त्याला पगारही मिळायला हवा. तसे होत नसल्यामुळे बराचसा युवक हा परदेशात जायला मागतो. त्याला आळा घालणे हे सरकारचे काम आहे. कलावंत हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. आयुष्यभर तो कलेची सेवा करत असतो. या धावपळीत एखाद दुसर्‍याचे उत्तम होते. पण बर्‍याचशा कलाकारांना त्यांच्या उतरत्या वयात अनेक व्याधींना, गरिबीला सामोरे जावे लागते.

सतत कलेची सेवा करत राहिल्याने त्याचे स्वत:च्या संसाराकडे थोडेफार दुर्लक्षही झालेले असते. अशा कलाकारांची सरकारने आदर आणि कदर करायला हवी. वृद्धावस्थेत सरकारचे संरक्षण या ज्येष्ठ कलाकारांना मिळायला हवे. आणखीन एक खटकणारी गोष्ट म्हणजे केंद्रात किंवा राज्यात जो कोणी सांस्कृतिक मंत्री असेल त्याला किमान साहित्याची, संस्कृतीची आवड असायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -