घरमुंबईसात वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसगिक लैगिंक अत्याचार

सात वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसगिक लैगिंक अत्याचार

Subscribe

वडाळा येथील घटना; गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक

वडाळा येथे एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसगिक लैगिंक अत्याचार झाल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकणी अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपीस डोंगरी येथून वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली आहे. फरीद अकबर चौधरी असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला शनिवारी विशेष सेशन कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पिडीत सात वर्षांचा मुलगा वडाळा येथील विजयनगर परिसरात त्याच्या पालकांसोबत राहतो. शुक्रवारी त्याचे आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी तो एकटाच घरात होता. घरासमोरच खेळत असताना आरोपी फरीद हा तिथे आला. त्याच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्याने त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अनैसगिक लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन तो तेथून पळून गेला होता. काही वेळाने त्याचे आई-वडिल घरी आले असता त्यांना हा प्रकार समजला.

ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी वडाळा टी टी पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शुक्रवारी रात्री फरीदला डोंगरी येथून अटक केली. पोलीस तपासात फरीद हा पूर्वी वडाळा परिसरात राहत होता. त्यामुळे पिडीत मुलगा त्याच्या परिचित होता. सध्या फरीद हा डोंगरी येथे राहत असून शुक्रवारी तो वडाळा येथे आला होता. यावेळी पिडीत मुलाला एकटा पाहून त्याने त्याच्यावर अनैसगिक लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले. पिडीत मुलाची मेडीकल करण्यात आली असून लवकरच आरोपीची पोलिसांकडून मेडीकल होणार आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -