घरमुंबईशरद कळसकरचा ताबा मिळवण्यात सीबीआयला यश

शरद कळसकरचा ताबा मिळवण्यात सीबीआयला यश

Subscribe

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरला न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली. आता डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरची समोरा समोर चौकशी होणार आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरचा ताबा मिळवण्यात सीबीआयला अखेर यश आले आहे. एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे मुंबई हायकोर्टाने मान्य केले आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने शरद कळसकरची रवानगी सीबीआय कोठडीत केली आहे. त्यामुळे आता सीबीआयला आता सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एतत्रित चौकशी करता येणार आहे.

- Advertisement -

मागच्या सुनावणी दरम्यान अर्ज फेटाळला

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसरचा देखील समावेश होता. त्यामुळे सीबीआयला दाभोलकर हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शरद कळसकरचा ताबा हवा होता. त्यासाठी सीबीआयने कळसकरचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने मागच्या सुनावणी दरम्यान अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला होता. मात्र न्यायालयाने आजच्या सुनावणी दरम्यान कळसकरला सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दोघांची समोरासमोर चौकशी करता येणार

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने वैभव राऊतसह पाच जणांना अटक केली होती. यामध्ये अटक करण्यात आलेल्या शरद कळसकर समावेश होते. एटीएसने दाभोलकर हत्या प्रकरणासंदर्भात कळसरकरची चौकशी केली असता दाभोलकराच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे त्याने मान्य केले होते. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली होती. आता सीबीआयला कळसकरचा ताबा मिळाल्यामुळे दोघांची समोरासमोर चौकशी सीबीआयला करता येणार आहे. या दोघांच्या चौकशीमधून अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -