घरदेश-विदेशपुरामुळे देशभरात १४०० नागरिकांचा मृत्यू - केंद्रीय गृहविभागाची माहिती

पुरामुळे देशभरात १४०० नागरिकांचा मृत्यू – केंद्रीय गृहविभागाची माहिती

Subscribe

पूरामुळे भारताच्या अनेक राज्यात हाहाकार उडाला आहे. गृहखात्याने आज यासंबंधी आकडेवारी जाहीर केली.

देशभरात पुरामुळे यावर्षी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महापुरामुळे आतापर्यंत १४०० नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकट्या केरळमध्ये ४८८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूर, पाऊस आणि भूस्खलन यामुळे १० राज्यांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे केंद्रीय गृहखात्याने सांगितले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्राच्या (NERC) यांच्यानुसार केरळमध्ये ४८८ लोक दगावले असून १४ राज्यातील ५४ लाख ११ हजार नागरिकांना पुराचा तडाखा बसला आहे. शतकातील सर्वात मोठा पूर म्हणून केरळच्या पुराकडे पाहीले जात आहे. केरळ राज्यात १४ लाख ५२ हजार लोक पुरामुळे विस्थापित झाले असून त्यांना रिलीफ कॅम्पमध्ये आसरा देण्यात आला आहे. केरळ राज्याच्या दक्षिण भागातील ५७ हजार हेक्टर्सवरील उभी पिके पावसामुळे उध्वस्त झाले आहे.

- Advertisement -

राज्यानुसार मृतांची आकडेवारी

देशाच्या इतरही राज्यातही पुरामुळे मृत्यूचे थैमान माजले आहे. उत्तर प्रदेश राज्यात २५४, पश्चिम बंगालमध्ये २१०, कर्नाटकात १७०, महाराष्ट्रात १३९, गुजरातमध्ये ५२, आसाम ५०, उत्तराखंडमध्ये ३७, ओडीशात २९ आणि नागालँडमध्ये ११ लोकांचा मृत्यू पुरपरिस्थितीतून उद्भवलेल्या संकटामुळे झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झालेले आहेत. गृहखात्याने सांगितल्याप्रमाणे ४३ देशभरात बेपत्ता असल्याचे कळते. केरळात १५, उत्तर प्रदेशमध्ये १४, पश्चिम बंगालमध्ये ५, उत्तराखंडमध्ये ६ आणि कर्नाटकात ३ लोक बेपत्ता आहेत. तसेच दहा राज्यात ३८६ लोक पावसामुळे जखमी झालेले आहेत.

दहा राज्यातील पावसाची दाहकता

पाऊस आणि पुराने ओडीशा राज्यातील ३० जिल्हे, महाराष्ट्राचे २६, आसाम २५, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यातील २३ जिल्हे, केरळ १४, उत्तराखंड १३, कर्नाटक आणि नागालँड मधील ११ जिल्हे आणि गुजरात राज्यातील १० जिल्हे पावसामुले प्रभावित झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -