घरमुंबईशरद पवारांनी सह्याद्री अतिथिगृहावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

शरद पवारांनी सह्याद्री अतिथिगृहावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील मदतकार्याविषयी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्री अतिथिगृहात जाऊन मुख्यंमत्र्यांची भेट घेतली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, शरद पवारांनी कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरामध्ये आलेल्या पुराच्या नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. या भेटीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असून शेतकऱ्यांना मदतकार्य वेगाने करण्याची विनंती केली आहे.

sharad pawar at sahyadri 1

- Advertisement -

ऊसाच्या नुकसानीवर चर्चा

‘कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये सोयाबीन, ऊस, भाजीपाला यांचा समावेश आहे. पूर आला तेव्हा ऊसाच्या उंचीएवढं पाणी शेतात होतं. यासाठी सरकारनं कर्जमाफीचं धोरण जाहीर केलं खरं, पण यामध्ये वाढ करून ते आर्थिक सहाय्य १ लाखापर्यंत करावं’, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. तसेच, ‘पूरग्रस्त भागामधल्या पशुधनाचं मोठं नुकसान झालं असून मोठ्या प्रमाणावर पशुधन वाहून गेलं आहे. त्याबाबत तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. अनेक भागांमध्ये जमिनीला देखील तडे गेले आहेत’, असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास शरद पवारांनी आणून दिलं.


हेही वाचा – जाहीर केलेली मदत पुरेशी नाही, नुकसान खूप मोठं आहे-शरद पवार

‘आचारसंहितेपूर्वीच लक्ष द्या’

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये अनेक भागांत झालेल्या घरांच्या नुकसानीविषयी देखील नमूद करण्यात आले आहे. ‘घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये गोरगरीबांची मातीची घरं देखील वाहून गेली आहेत. त्यांच्यासाठी टिकाऊ पर्याय देणं गरजेचं आहे’, असं देखील यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. याशिवाय, ‘सातारा, सांगली, कोल्हापूरसोबतच कोकण आणि पालघर जिल्ह्यात देखील मोठं नुकसान झालं आहे. त्याकडे आचारसंहिता जाहीर होण्याआधी लक्ष द्यावं’, असं देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -