घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : अजित पवारांवर गुन्हा दाखल करा! अंबादास दानवेंची मागणी

Lok Sabha 2024 : अजित पवारांवर गुन्हा दाखल करा! अंबादास दानवेंची मागणी

Subscribe

लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवारांच्या समोरचे बटन दाबा आणि निधी घ्या, हे अर्थमंत्री अजित पवार यांचे विधान निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असून या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवारांच्या समोरचे बटन दाबा आणि निधी घ्या, हे अर्थमंत्री अजित पवार यांचे विधान निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असून या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना केली. (Lok Sabha Election 2024 Ambadas Danve demands to file a case against Ajit Pawar)

अजित पवार यांनी बुधवारी इंदापूर येथील जाहीर सभेत बोलताना, आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र, तुम्ही मतदान करायला गेल्यानंतर आमच्या उमेदवारा समोरचे बटन कचा कचा दाबा आणि निधी घ्या, असे आवाहन मतदारांना केले होते. पवारांच्या या विधानासंदर्भात प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दानवे म्हणाले की, निवडणूक आयोगाचे फक्त विरोधी पक्षांकडे लक्ष आहे. बटन दाबा आणि निधी घ्या, हा धंदा आहे काय? हीच गोष्ट विरोधी पक्षांच्या लोकांनी केली असती तर निवडणूक आयोगाने आतापर्यंत गुन्हा दाखल केला असता. पवारांचे विधान निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा.

- Advertisement -

हेही वाचा – Sunetra Pawar : बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवारांवर शून्य रुपये कर्ज; उत्पन्न पतीपेक्षा कोट्यवधीने जास्त

राज्यातील लोकसभेच्या सात जागांवर महायुतीला उमेदवारच सापडेनासे झाले आहेत. त्या जागा कोण लढणार हे सुद्धा महायुती जाहीर करू शकलेले नाहीत. महाविकास आघाडीचे जवळपास सर्व उमेदवार जाहीर झाले असून प्रचारही सुरू झाला आहे. त्यामुळे प्रचारात आणि जागा जिंकण्यात महाविकास आघाडीच पुढे राहणार, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. भाजपाला सतत मोदी आणि शहा यांना निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात आणवे लागत आहे हे आमचे यश आहे, असेही दानवे म्हणाले.

- Advertisement -

भाजपा हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष संपविण्याचे काम करत आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार ठरविणे आणि उमेदवार बदलण्याचा निर्णयही भाजपा घेत आहे. सर्व पक्ष संपवून राज्यात केवळ भाजपाच ठेवण्याचे त्यांचे स्वप्न आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी भाजपावर केली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : माढ्यात तिहेरी लढत; गणपतराव देशमुखांचे नातू अपक्ष लढणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -