घरमुंबईमुख्यमंत्री तारखेनुसार, तर शिवसैनिक तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार

मुख्यमंत्री तारखेनुसार, तर शिवसैनिक तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार

Subscribe

अ‍ॅड. अनिल परब यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुनसुरु झालेला वाद वाढतच आहे. तारीख की तिथी यावरुन शिवजयंती वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिथी सोडा, तारखेनुसारच शिवजयंती साजरी करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकप्रकारे धर्मसंकटात सापडले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करतील, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती करणार आहे, असे परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले आहे. शिवजयंती एकच साजरी व्हावी हा वाद होता, त्याबाबत सरकार एक समिती स्थापन करणार आहे. त्यानंतर शिवजयंतीबाबत निर्णय होईल, असे अनिल परब यांनी सांगितले.

19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, तिथीचा हट्ट सोडा असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. त्याला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनीही पुष्टी जोडत, तारखेनुसारच शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत.

- Advertisement -

मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की, महाराष्ट्रात तारीख आणि तिथीचा वाद सुरु होतो. आता पुन्हा तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असे आवाहन ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -