घरमुंबईदसरा मेळाव्यात होणार 'राम नामाचा गजर'?

दसरा मेळाव्यात होणार ‘राम नामाचा गजर’?

Subscribe

आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा गाजणार हे नक्की. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचं शिवसेने देखील स्वागत केले आहे.

आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात राम मंदिराचा मुद्दा गाजणार अशीच चर्चा सध्या सुरू आहे. कारण, काहीच दिवसांपूर्वी राम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष जन्मेजयशरण महाराज यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर उभारण्यासाठी निमंत्रण देण्यास उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो. शिवसेने शिवाय देशात कुठलीही शक्ती नाही, जी अयोध्येत राम मंदिर उभारू शकते. अयोध्या हा शिवसेनेचा गड आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्र रक्षणासाठी आणि धर्म रक्षणासाठी निमंत्रण स्वीकारावे”, असा आग्रह धरला असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमिवर सरसंघचालक यांचे वक्तव्य देखील महत्त्वाचे ठरते. नागपुरात दसरा मेळाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी विशेष कायदा करण्याची गरज व्यक्त केली. त्यावर आता आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो. राम मंदिर उभारणीसाठी लवकर अध्यादेश काढावा, मागील दोन महिन्यापासून आम्ही राम मंदिराच्या मुद्यावर बोलत आहोत. त्यानंतर आता सगळेच आम्हाला फॉलो करत असल्याचे शिवेसेने म्हटले आहे.

वाचा – Live Update : ‘राम मंदिराच्या बांधणीसाठी कायदा करा’

शिवसेना आणि राम मंदिर कनेक्शन

शिवसेना आणि दसरा मेळावा याप्रमाणे शिवसेना आणि राम मंदिर हा देखील कायम चर्चेचा विषय आहे. कारण नव्वदच्या दशकामध्ये दसरा मेळाव्यामध्ये देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्याला हात घातला होता. शिवाय राम मंदिराच्या मुद्यावर जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा ‘ते शिवसैनिक असतील तर मला त्यांच्याबद्दल अभिमान असल्याचं वक्तव्य देखील बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होते. त्यात मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यापासून राम मंदिरचा मुद्दा देखील शिवसेनेच्या अजेंड्यावरती आहे. त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेने चलो अयोध्या, चलो वाराणसी अशी घोषणा देखील दिली आहे.

- Advertisement -

वाचा – उद्धव ठाकरेंची चलो वाराणसी,चलो अयोध्याची घोषणा!!

दसरा मेळाव्यात गाजणार राम मंदिराचा मुद्दा!

शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये देखील राम मंदिराचा मुद्दा गाजणार आहे. त्यात काहीच दिवसांपूर्वी राम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष जन्मेजयशरण महाराज यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत राम मंदिराबाबत शिवसेनेवर विश्वास दाखवला होता. दुसरीकडे शिवसेना उत्तर भारतामध्ये देखील निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये असून याचा फायदा हा शिवसेनेला नक्कीच होऊ शकतो.

वाचा – द्धव ठाकरेंना अयोध्येचे निमंत्रण; दसऱ्यानंतर राम मंदिराची वीट रचणार?

वाचा – ‘राम मंदिराच्या बाजूला मस्जिद बांधून देणार का?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -